पांदन रस्ता अतिक्रमण

उमरी खुर्द येथील पांदन रस्त्यावरील अतिक्रमण न हटवल्याने शेतकऱ्यांचे हाल

Pandan Rasta Encroachment: पांधन रस्त्यावर शेतकर्यांचे शेत जाण्यास अडथळा असल्यामुळे उपोषणासाठी इशारा देऊन शेतकरी प्रबळ मागणी करीत आहेत. गेल्या तीन वर्षात कार्यवाही झाली नाहीत.

उमरी खुर्द येथील पांदन रस्त्यावरील अतिक्रमण न हटवल्याने शेतकऱ्यांचे हाल

Pandan Rasta Encroachment

 

७७  शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या
अतिक्रमण न हटविल्यास १४ ऑगस्ट पासून उपोषणाचा इशारा

मानोरा (Pandan Rasta Encroachment) : तालुक्यातील उमरी खुर्द येथील पांदन रस्त्यावरील किराणा दुकानाचे अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्याची  मागणी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे वारंवार करण्यात आलेल्या तक्रारींवर गेल्या ३ वर्षांपासून कोणतीही कार्यवाही न झाल्याने गावातील शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. याबाबत राजेश बाबुराव राठोड यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी तहसीलदार राजेंद्र पाटील यांना दि. १३ जुलै रोजी निवेदन देऊन तातडीने अतिक्रमण काढण्याची मागणी केली आहे.  

निवेदनानुसार, गैरअर्जदार पंडित भावसिंग राठोड, रा. उमरी खुर्द यांनी पांदन रस्त्यावर किराणा दुकानाचे अतिक्रमण केले आहे. हे (Pandan Rasta Encroachment) अतिक्रमण हटवून पांदन रस्ता खुला करावा यासाठी राजेश राठोड यांनी आतापर्यंत सहा वेळा विविध स्तरावर प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु सबंधित कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. पांदन रस्ता बंद असल्यामुळे ७८ शेतकरी खातेदारांच्या शेतात जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन गैरअर्जदाराचे पांदन रस्त्यावरील दुकानाचे अतिक्रमण तातडीने हटवून रस्ता मोकळा करावा, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाता येईल, अशी मागणी केली आहे.

प्रशासनाने या (Pandan Rasta Encroachment) प्रकरणाची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा १४ ऑगस्ट २०२६ पासून तहसील कचेरीसमोर उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रतिलिपी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ..  बाबुसिंग महाराज राठोड, आ. सईताई डहाके, जिल्हाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, गट विकास अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, ग्राम पंचायत अधिकारी आदींना पाठविण्यात आल्याचे निवेदनात नमूद केले असुन तहसीलदार यांना निवेदन देतेवेळी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

संबंधित सामग्री

कर्जमाफी झाली, पैसेही आले; मात्र पीक कर्ज मिळेना! IOB शाखेत शेतकऱ्यांचे चार तास ठिय्या आंदोलन

कर्जमाफी झाली, पैसेही आले; मात्र पीक कर्ज मिळेना! IOB शाखेत शेतकऱ्यांचे चार तास ठिय्या आंदोलन

कर्जमाफीची रक्कम मिळूनही IOB एकलारा शाखेतील २८८ शेतकऱ्यांची खाती बंद नाहीत. नवीन पीक कर्जासाठी चार तास ठिय्या आंदोलनानंतर तातडीच्या कार्यवाहीचे आदेश.

Sep 26, 2026
शेतकरी उन्हात वाट पाहतच राहिले; मुख्यमंत्री न भेटताच निघून गेले!

शेतकरी उन्हात वाट पाहतच राहिले; मुख्यमंत्री न भेटताच निघून गेले!

तावशीतील शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी तासन्‌तास उन्हात थांबले; भेट न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत करपलेल्या पिकांची होळी केली.

Sep 24, 2026
चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवा

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवा

चंद्रपूर-गडचिरोलीतील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महेंद्र ब्राह्मणवाडे यांची पत्रकार परिषद; धान खरेदी, नुकसानभरपाई, महामार्ग व रोजगाराच्या मागण्या.

Sep 18, 2026
नागभीडमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा; ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दराची मागणी

नागभीडमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा; ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दराची मागणी

धान बोनस, ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दर आणि २४ तास वीजपुरवठ्याच्या मागणीसाठी प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वात नागभीडमध्ये हजारो शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा.

Sep 17, 2026
पालकमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पालकमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दौऱ्यापूर्वी नामदेव पतंगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा आरोप; जिल्हाभर आंदोलनाचा इशारा.

Sep 16, 2026