क्रांतिकारी शेतकरी संघटना

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे महावितरण च्या अधीक्षक अभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलन

Revolutionary Farmers' Organization: जिल्ह्यात सुरू असलेले अतिरिक्त भारनियमन तात्काळ बंद करावे,  कलगाव व भांडेगाव येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी रात्रीची सिंगल फेज वीज उपलब्ध करून द्यावी

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे महावितरण च्या अधीक्षक अभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलन

Revolutionary Farmers' Organization

 

जिल्ह्यातील अतिरिक्त भारनियमन तात्काळ बंद करण्याची मागणी

हिंगोली (Revolutionary Farmers' Organization) : जिल्ह्यात सुरू असलेले अतिरिक्त भारनियमन तात्काळ बंद करावे,  कलगाव व भांडेगाव येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी रात्रीची सिंगल फेज वीज उपलब्ध करून द्यावी, शेतकऱ्यांचे प्रलंबित वीजविषयक प्रश्न तातडीने सोडवावेत तसेच सोलार योजनांची कामे वेळेत पूर्ण करावीत, या प्रमुख मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांसह महावितरणच्या अधीक्षक अभियंता यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले.हे आंदोलन जवळपास एक ते दोन तास सुरू होते.

आंदोलना दरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि अधीक्षक अभियंत्यांनी तसेच काही अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तीव्र चर्चा केली.हिंगोली जिल्ह्यात महावितरण मध्ये कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर कमतरता असल्याने शेतकऱ्यांची कामे वेळेवर होत नसल्याचा गंभीर आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला. तसेच अतिरिक्त भारनियमनामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून तात्काळ ते बंद करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी कलगाव व भांडेगाव येथील शेतकऱ्यांना रात्रीची सिंगल फेज वीज तातडीने उपलब्ध करून द्यावी, शेतकऱ्यांच्या सोलार योजनांची प्रकरणे प्राधान्याने निकाली काढावीत आणि महावितरणच्या कामकाजात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून शेतकऱ्यांची रखडलेली कामे पूर्ण करावीत, अशी मागणीही करण्यात आली. आंदोलनानंतर अधीक्षक अभियंता यांनी संघटनेच्या मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, दिलेल्या निवेदनानुसार व लेखी आश्वासनानुसार वेळेत कार्यवाही झाली नाही, तर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने अधिक तीव्र स्वरूपाचे लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

या (Revolutionary Farmers' Organization) आंदोलनात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, प्रवीण मते, रमेश जाधव, अशोक जयस्वाल, विशाल पौळ, रावसाहेब घुमनर, अशोक पौळ, भाऊराव पौळ, गजानन पौळ, दामोदर घुमनर, प्रभात पौळ, बबन पौळ, पवन पौळ यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

महावितरणतर्फे स्पेशल डिझाईन ट्रान्सफॉर्मर बसविण्याची कार्यवाही

कलगाव () : भांडेगाव येथे शेतकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रात्रीच्या वेळी सिंगल फेज वीज पुरवठा सुरू ठेवण्याबाबत तसेच भारनियमन तात्काळ बंद करण्याबाबत क्रांतिकारी शेतकरी संघटनेने आंदोलन करत या संदर्भात निवेदन दिले होते.  त्याची दखल घेत  वीज वितरण कंपनीच्या अधिक्षक अभियंता यांनी लेखी पत्राद्वारे  कलगाव व भांडेगाव परिसरात रात्रीच्या वेळी सिंगल फेज बोज पुरवठा सुरळीत उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणतर्फे स्पेशल डिझाईन ट्रान्सफॉर्मर बसविण्याची कार्यवाहो हाती घेण्यात आली असून, सदर काम पुढील 8 ते 10 दिवसांच्या आत पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर संबंधित परिसरात रात्रीच्या वेळी सिंगल फेज वीज पुरवठा नियमित ठेवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. तथापी शेतात राहणारे शेतकऱ्यांना रहिवाशी मिटरचे कनेक्शन घ्यावे लागेल, असे पत्राद्वारे कळविले आहे

संबंधित सामग्री

दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रोखला अडीच तास महामार्ग!

दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रोखला अडीच तास महामार्ग!

Marathwada Farmers' Protest: पावसाची अनिश्चितता, शेतीमालाला अपेक्षित भावाचा अभाव, वाढता उत्पादन खर्च आणि कर्जाचा डोंगर यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या संतापाचा अखेर महामार्गावर उद्रेक

Aug 23, 2026
पोतरा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला शेतकर्‍यांनी ठोकले कुलूप

पोतरा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला शेतकर्‍यांनी ठोकले कुलूप

Potara Veterinary Clinic: कळमनुरी तालुक्यातील पोतरा गावात पशुवैद्यकीय दवाखान्यात कर्मचारी हजर नसल्याने गायीवर योग्य उपचार न झाल्याने तिचे वासरू दगावल्याची संतापजनक घटना घडली

Aug 20, 2026
परभणीत आयटकचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन 

परभणीत आयटकचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन 

Parbhani Dharane Protest: केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी व जनविरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. तसेच चार कामगारविरोधी श्रमसंहिता रद्द करण्याच्या मागणी

Aug 11, 2026
..तर राज्यभरातील शेतकर्‍यांचा हिंगोलीत मोर्चा

..तर राज्यभरातील शेतकर्‍यांचा हिंगोलीत मोर्चा

Hingoli Farmers' March: शेतकरी कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास संपूर्ण राज्यातील शेतकर्‍यांना हिंगोलीत आणून आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर

Aug 04, 2026
कर्जमाफी यादी आणि बँकेच्या आकडेवारीत मोठी तफावत

कर्जमाफी यादी आणि बँकेच्या आकडेवारीत मोठी तफावत

Farmer Loan Waiver List: प्रशासनाने जाहीर केलेली यादी, केवायसी (KYC) पावती आणि बँकेकडून प्रत्यक्षात लिहून दिलेली रक्कम यामध्ये कोणतीही सुसंगती नसल्याने सर्वकाही विस्कळीत झाले

Jul 28, 2026