पोतरा पशुवैद्य दवाखाना

पोतरा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला शेतकर्‍यांनी ठोकले कुलूप

Potara Veterinary Clinic: कळमनुरी तालुक्यातील पोतरा गावात पशुवैद्यकीय दवाखान्यात कर्मचारी हजर नसल्याने गायीवर योग्य उपचार न झाल्याने तिचे वासरू दगावल्याची संतापजनक घटना घडली

पोतरा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला शेतकर्‍यांनी ठोकले कुलूप

Potara Veterinary Clinic

 

उपचारा अभावी वासरू दगावले, गाय गंभीर, डॉक्टर कधीच हजर नसल्याचा आरोप

आखाडा बाळापूर (Potara Veterinary Clinic) : कळमनुरी तालुक्यातील पोतरा गावात पशुवैद्यकीय दवाखान्यात कर्मचारी हजर नसल्याने गायीवर योग्य उपचार न झाल्याने तिचे वासरू दगावल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकरी व गावकर्‍यांनी  २० ऑगस्ट गुरुवार रोजी पशुवैद्यकीय दवाखान्याला कुलूप ठोकले आहे. पोतरा येथील पशुवैद्यकीय समितीचे अध्यक्ष दत्तराव मुलगीर यांनी १९ ऑगस्ट बुधवार रोजी प्रसूतीसाठी गाय दवाखान्यात आणली होती. मात्र दवाखान्यात एकही कर्मचारी हजर नसल्याने तिच्यावर उपचारच झाले नाहीत. परिणामी वासरू उपचाराअभावी दगावले असून गाय देखील गंभीर अवस्थेत आहे. 

याबाबत जिल्हा पशुधन अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात गावकर्‍यांनी गंभीर आरोप केले आहेत.पोतरा येथील पशुधन वैद्यकीय अधिकारी श्रेणी-१ डॉ. अजय राठोड हे रुजू झाल्यापासून दवाखान्यात एकदाही आले नाहीत.येथे आठवड्यातून दोन दिवस ड्युटी असलेले डॉ. जनकवाडे हे देखील दवाखान्यात येत नाहीत. त्यांना विचारले असता मला पोतरा येथे येण्यास वेळ नाही अशी उडवाउडवीची उत्तरे देतात- या (Potara Veterinary Clinic) दवाखान्यात फक्त सेवक गणपत बर्गे हेच हजर असतात, बाकी कोणीच हजर राहत नाही. सध्या पावसाळा सुरू असून गावातील अनेक जनावरे आजारी पडत आहेत. अशा वेळी उपचाराची कोणतीही सुविधा नसल्याने शेतकर्‍यांमध्ये प्रचंड रोष आहे.

या (Potara Veterinary Clinic) दवाखान्यात तातडीने कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनावर दत्तराव मुलगीर, जीजाराम मुलगीर, अनिल रणखांब, व्यंकट मुलगीर, सुनील मुलगीर, गणेश मुलगीर, पंडितराव मुलगीर, बबन चौधरी, शिवाजी मुलगीर, रामराव मुलगीर, गणेश रणवीर, रघुनाथ मुलगीर, ओमप्रकाश मुलगीर, पारस चेभेले, संतोष भुसनर, दशरथ कलगोंडे, शंकर मुलगीर आदी शेतकर्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

संबंधित सामग्री

दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रोखला अडीच तास महामार्ग!

दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रोखला अडीच तास महामार्ग!

Marathwada Farmers' Protest: पावसाची अनिश्चितता, शेतीमालाला अपेक्षित भावाचा अभाव, वाढता उत्पादन खर्च आणि कर्जाचा डोंगर यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या संतापाचा अखेर महामार्गावर उद्रेक

Aug 23, 2026
परभणीत आयटकचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन 

परभणीत आयटकचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन 

Parbhani Dharane Protest: केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी व जनविरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. तसेच चार कामगारविरोधी श्रमसंहिता रद्द करण्याच्या मागणी

Aug 11, 2026
..तर राज्यभरातील शेतकर्‍यांचा हिंगोलीत मोर्चा

..तर राज्यभरातील शेतकर्‍यांचा हिंगोलीत मोर्चा

Hingoli Farmers' March: शेतकरी कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास संपूर्ण राज्यातील शेतकर्‍यांना हिंगोलीत आणून आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर

Aug 04, 2026
कर्जमाफी यादी आणि बँकेच्या आकडेवारीत मोठी तफावत

कर्जमाफी यादी आणि बँकेच्या आकडेवारीत मोठी तफावत

Farmer Loan Waiver List: प्रशासनाने जाहीर केलेली यादी, केवायसी (KYC) पावती आणि बँकेकडून प्रत्यक्षात लिहून दिलेली रक्कम यामध्ये कोणतीही सुसंगती नसल्याने सर्वकाही विस्कळीत झाले

Jul 28, 2026
वसमतमध्ये संभाजी ब्रिगेडचे 'रस्ता रोको आंदोलन 

वसमतमध्ये संभाजी ब्रिगेडचे 'रस्ता रोको आंदोलन 

Sambhaji Brigade Protest:  संभाजी ब्रिगेडच्या वतीने शेतकऱ्यांच्या समस्या विद्यार्थ्यावर झालेला लाठी हल्ला यासह विविध मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले कवठा टी पॉईंट येथे झालेल्या आंदोलन

Jul 25, 2026