Farmer Dialogue Meet

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी परभणीत; शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन, राजकीय आखाडाही रंगणार

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर खासदार संजय जाधव यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी परभणीत; शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन, राजकीय आखाडाही रंगणार

Farmer Dialogue Meet

परभणी : उद्धव ठाकरे परभणीत येऊन गेल्यानंतर शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा मंगळवार, ७ जुलै रोजी होणार आहे. शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम मैदानावर दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी संवाद मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर विचारमंथन होणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर खासदार संजय जाधव यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. यावेळी जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, प्रवीण देशमुख, मदन लांडगे, बाळासाहेब पानपट्टे आणि माणिक पौंढे उपस्थित होते.

हजारो शेतकऱ्यांशी थेट संवाद

पुढे बोलताना खासदार संजय जाधव म्हणाले की, शहरातील क्रीडा संकुल मैदानावर होणाऱ्या संवाद मेळाव्याला हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती राहणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थेट शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच प्रतिष्ठित व्यापारी, डॉक्टर, वकील आणि नागरिकांशीही ते संवाद साधणार आहेत.

पक्षांतरामागे जिल्ह्याच्या विकासाचा उद्देश

पक्षप्रवेशाबाबत बोलताना खासदार संजय जाधव यांनी परभणी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण पक्षांतराचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यातील अनेक प्रलंबित विकासकामांना गती देण्याबरोबरच नवीन विकासकामे मंजूर करून ती मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच परभणी महानगरपालिकेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासोबतच नटराज रंगमंदिर आणि नव्याने उभारण्यात येत असलेल्या नाट्यगृहाच्या कामांसाठीही शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही खासदार संजय जाधव यांनी दिली.

दिग्गजांचा शिवसेनेत प्रवेश होणार

आगामी काळात विविध पक्षांतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. "माझा प्रवेश झाला, आता माझ्यावर विश्वास ठेवणारे देखील माझ्यासोबत येणार आहेत. जिल्ह्यातील अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत," असे खासदार संजय जाधव यांनी सांगितले.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ आणि धर्मांतराविरोधात कठोर कायदा येणार?

‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ आणि धर्मांतराविरोधात कठोर कायदा येणार?

West Bengal UCC: पश्चिम बंगालच्या राजकारणात समान नागरी कायदा म्हणजेच UCC लागू करण्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालमध्ये लवकरच UCC लागू

Oct 05, 2026
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा. २१ जागांसाठी ११ ऑक्टोबरला मतदान; तीन पॅनेलमध्ये तिरंगी लढत.

Oct 05, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026