संपत्ती वादातून टोकाचे पाऊल : नागपूरमध्ये आई आणि मुलीने गळफास घेत जीवन संपवले

नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत आई आणि तिच्या विवाहित मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

संपत्ती वादातून टोकाचे पाऊल : नागपूरमध्ये आई आणि मुलीने गळफास घेत जीवन संपवले

Family Dispute Case

नागपूर (Family Dispute Case) : नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत आई आणि तिच्या विवाहित मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ निर्माण झाली असून कौटुंबिक वाद आणि मानसिक तणाव हे या टोकाच्या पावलामागील कारण असण्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. मृतांमध्ये संगीत ढबाले (आई) आणि आकांक्षा ब्रम्हे (मुलगी) यांचा समावेश आहे. दोघीही नंदनवन परिसरात एकाच घरात वास्तव्यास होत्या. बुधवारी रात्री उशिरा त्यांनी घरातील लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेतल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघींना खाली उतरवत रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

आई आणि मुलगी मानसिक तणावाखाली असल्याचेही समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आकांक्षा ब्रम्हे हिचा विवाह सुमारे दोन वर्षांपूर्वी लोकेश ब्रम्हे याच्यासोबत झाला होता. काही महिन्यांपूर्वी तिने एका मुलीला जन्म दिला होता, मात्र त्या नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर ती गंभीर मानसिक तणावात होती आणि काही काळापासून आईकडे राहत होती.

दरम्यान, आकांक्षाचा पती लोकेश ब्रम्हे याच्यासोबत संपत्तीच्या कारणावरून सातत्याने वाद सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. शेती, घर आणि इतर मालमत्तेच्या वाटणीवरून कुटुंबात तणाव वाढत असल्याचेही सांगितले जात आहे. 30 एप्रिलच्या रात्रीही लोकेश घरी आला असता पुन्हा वाद झाल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. या सततच्या भांडणांमुळे आणि मानसिक दबावामुळे आई–मुलीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

घटनास्थळी पोलिसांना एक सुसाइड नोट देखील सापडली आहे. त्यामध्ये अंत्यसंस्कार गावात वडिलांच्या ठिकाणी करण्यात यावेत अशी इच्छा व्यक्त करण्यात आली असून सासरच्या मंडळींकडे मृतदेह देऊ नये, असेही नमूद असल्याची माहिती आहे.

नंदनवन पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू असून पती लोकेश ब्रम्हे याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

संबंधित सामग्री

पुण्याजवळ धक्कादायक प्रकार; आजारपणामुळे घरात तणाव; ४३ वर्षीय मामाची हत्या केल्यानंतर भाच्याने संपवले जीवन

पुण्याजवळ धक्कादायक प्रकार; आजारपणामुळे घरात तणाव; ४३ वर्षीय मामाची हत्या केल्यानंतर भाच्याने संपवले जीवन

माधवनगरमध्ये आजारी मामाची हत्या केल्यानंतर २० वर्षीय भाच्याने आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये मामाच्या त्रासाचा उल्लेख; खेड पोलिसांचा तपास सुरू.

Sep 20, 2026
नागपूर मध्ये अंबिका नगरात तान्हा पोळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

नागपूर मध्ये अंबिका नगरात तान्हा पोळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

अंबिका नगर येथे बाळ मित्र शिव सेवा मंडळाच्या वतीने तान्हा पोळ्यानिमित्त महाआरती, नंदी बैल पूजा, गोपालकाला आणि बक्षीस वितरणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Sep 10, 2026
नागपुरात गणेशोत्सवात डीजे-डॉल्बीवर बंदी; ३ सप्टेंबरपासून १ नोव्हेंबरपर्यंत आदेश लागू

नागपुरात गणेशोत्सवात डीजे-डॉल्बीवर बंदी; ३ सप्टेंबरपासून १ नोव्हेंबरपर्यंत आदेश लागू

नागपूर शहरात आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने डीजे आणि डॉल्बी साऊंड सिस्टीमच्या वापराबाबत कडक भूमिका घेतली आहे.

Sep 03, 2026
‘आता पूर्वीसारखं काम करू शकत नाही’; नितीन गडकरींच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?

‘आता पूर्वीसारखं काम करू शकत नाही’; नितीन गडकरींच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका वक्तव्यामुळे भाजपच्या राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

Aug 25, 2026
नागपुरात क्लोरीन गॅसची गळती; 52 जण रुग्णालयात, 200 मीटर परिसर सील

नागपुरात क्लोरीन गॅसची गळती; 52 जण रुग्णालयात, 200 मीटर परिसर सील

नागपूरच्या गोधणी परिसरात मध्यरात्री क्लोरीन गॅसची गळती झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Aug 24, 2026