लाचखोर ग्राम महसुल अधिकारी

खिल्लारचे लाचखोर ग्राम महसुल अधिकारी निलंबित

Corrupt Revenue Officer: खिल्लार तलाठीचे तरुण पती रामेश्वर अर्जुन रोडगे लाच खोटी साबित झाल्यावर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी त्यांचा निलंबन आदेश दिला आहे.

खिल्लारचे लाचखोर ग्राम महसुल अधिकारी निलंबित

Corrupt Revenue Officer

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काढले आदेश

हिंगोली (Corrupt Revenue Officer) : सेनगाव तालुक्यातील खिल्लार सज्जाचे ग्राम महसुल अधिकारी (तलाठी) रामेश्वर अर्जुन रोडगे यांनी ५ जूनला एका शेतकर्‍याकडून सातबारावर नाव लावण्याकरीता १४ हजाराची लाच स्विकारली होती. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने हिंगोली - सेनगाव रस्त्यावरील पुसेगाव फाटा परिसरात लाच घेताना रंगेहात पकडले होते. या (Corrupt Revenue Officer) प्रकरणात नर्सी नामदेव पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.  त्यावरून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयिन कोठडी सुनावल्याने परभणी कारागृहात रवानगी करण्यात आली होती. या दरम्यान जामीनसाठी अर्ज दाखल केला असता न्यायालयाने त्यांची जामीनवर मुक्तता केली होती. 

या (Corrupt Revenue Officer) प्रकरणाचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यावरून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी १२ जून रोजी काढलेल्या आदेशात खिल्लार सज्जाचे तलाठी रामेश्वर अर्जुन रोडगे यांच्या निलंबनाचे आदेश काढले. या प्रकरणी त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असुन हा आदेश अंमलात असेपर्यंत तहसील कार्यालय हिंगोली येथे मुख्यालयी उपस्थित राहण्याचे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026