Fake Seeds

वाशिममध्ये बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे दुबार पेरणीचे संकट; कंपन्यांवर कारवाई व आर्थिक मदतीची मागणी

वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.

वाशिममध्ये बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे दुबार पेरणीचे संकट; कंपन्यांवर कारवाई व आर्थिक मदतीची मागणी

Fake Seeds

परिवर्तन शेतकरी संघटनेचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन

मानोरा : वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. खुल्या बाजारातून सोयाबीन खरेदी करून ते कंपनीच्या नावाने बॅगमध्ये भरून बियाणे म्हणून विक्री केल्याने हजारो शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी परिवर्तन शेतकरी संघटनेचे नेते मनोहर राठोड यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन देत संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यासह शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मानोरा तालुक्यातील सुमारे ३० टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या उलटल्या आहेत. शेतकऱ्यांनी कृषी केंद्रातून "पांढऱ्या फुलांचे" सोयाबीन बियाणे खरेदी केले होते. मात्र, या बियाण्यांना अंकुरच फुटला नसल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. यासाठी संबंधित सोयाबीन कंपन्यांना जबाबदार धरावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनानुसार, सन २०२५ मध्ये वाशिम व कारंजा बाजारातून विविध कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी केले होते. त्यामध्ये आरव्हीएसएम ११३५ या वाणासाठी ६,००० ते ७,५०० रुपये प्रति क्विंटल, विहार बायोटेक यांनी ७,५०० ते ९,२०० रुपये, रवी सिड्स यांनी ६,००० ते ७,५०९ रुपये, विस्तारा कंपनीने ५,५०० ते ६,५०० रुपये, तर ३३५ वाणासाठी ४,८०० ते ५,२०० रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीन खरेदी करून ते बियाणे म्हणून कंपनीच्या नावाने विक्री केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या बोगस बियाण्यांमुळे शेतात उगवण न झाल्याने शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करावी लागत असून बियाणे, मशागत आणि मजुरीचा दुहेरी खर्च सहन करावा लागत आहे. तसेच "पांढऱ्या फुलांचे" हजारो क्विंटल सोयाबीन कंपन्यांनी कसे तयार केले आणि किती शेतकऱ्यांना फाऊंडेशन बियाणे दिले, याचीही सखोल चौकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

परिवर्तन शेतकरी संघटनेने बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या कंपन्यांवर तातडीने फौजदारी कारवाई करावी, दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर आर्थिक मदत जाहीर करावी आणि जिल्ह्यातील बियाणे विक्रीवर कडक नियंत्रण ठेवून विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी केली आहे.

वाशिम हा आकांक्षित जिल्हा असतानाही शेतकऱ्यांना सातत्याने नैसर्गिक तसेच आता मानवनिर्मित संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित सोयाबीन कंपन्यांविरुद्ध कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी परिवर्तन शेतकरी संघटनेने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026