गडचिरोलीत बनावट नोटांचे रॅकेट सक्रिय

 गडचिरोली शहरातील कारगिल चौकासमोरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या मुख्य शाखेतील पैसे जमा करण्याच्या एटीएममध्ये बनावट नोटा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

गडचिरोलीत बनावट नोटांचे रॅकेट सक्रिय

Fake Currency

चंद्रपूर जिल्ह्यातील युवकाने बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये जमा केल्या बनावट नोटा

गडचिरोली (Fake Currency) : गडचिरोली शहरातील कारगिल चौकासमोरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या मुख्य शाखेतील पैसे जमा करण्याच्या एटीएममध्ये बनावट नोटा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयित युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

युवकास अटक; ७ दिवसांची पोलीस कोठडी

मिळालेल्या माहितीनुसार, ११ मे रोजी संबंधित एटीएममध्ये १०० रुपयांच्या २१ बनावट नोटा, अशी एकूण २ हजार १०० रुपयांची रक्कम आढळून आली. संशयित आरोपी युवक प्रमोद टिकाराम कोवे याने १०० रुपयांच्या २१ नकली नोटा पश्चिम महाराष्ट्रातील मिरज येथील एका खातेदाराच्या खात्यात जमा केल्या होत्या. चौकशीअंती सदर बाब बँकेच्या मुख्य शाखेच्या निदर्शनास आल्यानंतर शाखा व्यवस्थापकांना तातडीने एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले.

यानंतर गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी प्रमोद टिकाराम कोवे (वय २३, रा. हळदा, ता. ब्रह्मपुरी, सध्या रा. इंदिरानगर, गडचिरोली) या संशयित युवकाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या युवकाला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत.

संबंधित सामग्री

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
“पुराव्याशिवाय माझ्यावर आरोप”; पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा

“पुराव्याशिवाय माझ्यावर आरोप”; पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे-राऊतांवर पलटवार; पुराव्याशिवाय आरोप होत असल्याचा दावा करत दिशा सालियन प्रकरणावरही सवाल.

Oct 02, 2026