Electric Shock

मुंबईच्या जोगेश्वरीत गणेश विसर्जनावेळी विजेचा धक्का; १९ वर्षीय रोहित राठोडचा दुर्दैवी मृत्यू

कृत्रिम तलावातील पाणी किंवा यंत्रणेत विद्युतप्रवाह उतरल्याची प्राथमिक माहिती; मेघवाडी पोलिसांकडून ADR दाखल करून तपास सुरू

मुंबईच्या जोगेश्वरीत गणेश विसर्जनावेळी विजेचा धक्का; १९ वर्षीय रोहित राठोडचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई : गणेशोत्सवाच्या उत्साहावर जोगेश्वरी पूर्वेतील श्यामनगर परिसरात घडलेल्या दुर्घटनेने दुःखाची छाया पसरली आहे. गौरी-गणपती विसर्जनासाठी गेलेल्या रोहित भीमसिंग राठोड (वय १९) या तरुणाचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. ट्रॉमा केअर रुग्णालय परिसरातील कृत्रिम तलावात विसर्जन सुरू असताना ही घटना घडली. कृत्रिम तलावातील पाणी किंवा संबंधित विद्युत यंत्रणेतून विद्युतप्रवाह उतरल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

शनिवारी सायंकाळी रोहित जोगेश्वरी पूर्वेतील श्यामनगर येथील कृत्रिम तलावावर गौरी-गणपती विसर्जनासाठी गेला होता. विसर्जनाची प्रक्रिया सुरू असतानाच त्याला अचानक विजेचा तीव्र धक्का बसला. यात तो गंभीर जखमी झाला. उपस्थितांनी त्याला तातडीने जवळच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

रोहित हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या आईचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे एकुलत्या एक मुलाच्या आकस्मिक मृत्यूने त्याच्या वडिलांवर मोठे दुःख कोसळले आहे. घटनेची माहिती मिळताच रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी आक्रोश केला.

विसर्जनस्थळाच्या सुरक्षेवर नातेवाईकांचे प्रश्न

रोहितच्या मृत्यूनंतर विसर्जनस्थळी करण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेबाबत नातेवाईकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. विद्युत सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती का, पाण्यात विद्युतप्रवाह उतरला असल्यास त्यासाठी जबाबदार कोण, तसेच परिस्थिती धोकादायक असताना भाविकांना विसर्जनासाठी प्रवेश कसा देण्यात आला, याची उत्तरे प्रशासनाने द्यावीत, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.

पालिका प्रशासनाच्या व्यवस्थेची चौकशी करण्याची मागणी

घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि गणेशोत्सव समन्वय समितीचे पदाधिकारी घटनास्थळी पोहोचले. विसर्जन व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या यंत्रणेकडून सुरक्षा नियमांची योग्य अंमलबजावणी झाली होती का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

विसर्जनस्थळी विद्युत सुरक्षेबाबत महापालिका आणि पोलिसांच्या बैठकीत यापूर्वीच आवश्यक सूचना देण्यात आल्याचा दावा गणेशोत्सव समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे बैठकीत दिलेल्या सूचनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली होती की नाही, याचीही तपासणी करण्याची मागणी पुढे आली आहे.

दोषी आढळल्यास कारवाईची मागणी

रोहितला विजेचा धक्का नेमका कोणत्या कारणामुळे बसला, विद्युतप्रवाह पाण्यात कशा प्रकारे उतरला आणि विसर्जन व्यवस्थेत नेमकी कुठे हलगर्जीपणा झाला, याचा तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशीत संबंधित पालिका अधिकारी, कंत्राटदार किंवा अन्य कोणाची निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईक आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, मेघवाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद (ADR) केली असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. विजेचा धक्का लागण्यामागील नेमके कारण शोधण्याबरोबरच घटनास्थळावरील विद्युत यंत्रणा, कृत्रिम तलावाची विसर्जन व्यवस्था आणि सुरक्षेच्या उपाययोजनांची पोलिसांकडून सखोल पडताळणी केली जात आहे.

संबंधित सामग्री

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026
दसऱ्याआधी सोन्याच्या दरात मोठी घसरण; २४ कॅरेट सोने ₹१,४९,७०० वर

दसऱ्याआधी सोन्याच्या दरात मोठी घसरण; २४ कॅरेट सोने ₹१,४९,७०० वर

दसऱ्याआधी सोन्याच्या दरात घसरण झाली. २४ कॅरेट सोने ₹१,४९,७००, तर २२ आणि १८ कॅरेटचे दरही कमी झाले.

Oct 07, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचा खेळ? २० वर्षीय अमन सोनीचा मृत्यू, चार मित्र ताब्यात

अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचा खेळ? २० वर्षीय अमन सोनीचा मृत्यू, चार मित्र ताब्यात

मालाडच्या कुरार व्हिलेजमध्ये २० वर्षीय अमन सोनीचा ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला. अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचे इंजेक्शन दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप असून चार मित्र ताब्यात घेण्यात आले आह

Oct 05, 2026
पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीनंतर ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला आहे. मुंबई-कोकणात दमट उकाडा, पुण्यात बदलते हवामान आणि नागपुरात ३५ अंश तापमान आहे.

Oct 05, 2026