ठाण्यात वृद्धाला मारहाण प्रकरण गाजले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कठोर कारवाईचे आदेश

ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयासमोरील परिसरात एका वृद्ध नागरिकाला झालेल्या मारहाणीच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे.

ठाण्यात वृद्धाला मारहाण प्रकरण गाजले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कठोर कारवाईचे आदेश

Elderly Man Assaulted

रस्त्यावर थुंकण्याबाबत जाब विचारल्याने हल्ला; शिवसेना व शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी आरोपीला शोधून पोलिसांच्या ताब्यात दिले

ठाणे (Elderly Man Assaulted) : ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयासमोरील परिसरात एका वृद्ध नागरिकाला झालेल्या मारहाणीच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे. रस्त्यावर थुंकल्याबद्दल एका चालकाला जाब विचारल्यानंतर त्याने वृद्ध व्यक्तीवर हल्ला केल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.

मंगळवारी सायंकाळी ज्युपिटर रुग्णालयासमोरील पदपथावरून एक वृद्ध दाम्पत्य जात असताना निशांत धर शुक्ला (वय 40) हा चालक रस्त्यावर थुंकताना दिसला. त्यावेळी संबंधित वृद्धाने त्याला सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करू नये, असे सांगत जाब विचारला. यामुळे संतप्त झालेल्या शुक्लाने वृद्धाशी वाद घालत त्यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर झालेल्या झटापटीत त्याने वृद्धाला मारहाण करून पदपथावर ढकलले. या घटनेत वृद्ध नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाला वेग आला. व्हिडीओमध्ये आरोपी चालकाच्या हातात दगड असल्याचेही दिसून येत असल्याने हल्ल्याचे गांभीर्य अधिक वाढले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधून आरोपीवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याबाबत निर्देश दिले.

दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखाप्रमुख सुमित बोराटे यांनी अवघ्या दोन तासांत आरोपीचा शोध घेतला. त्यानंतर शिवसेनेचे शाखाप्रमुख नितेश पाटोळे हेही घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आरोपी निशांत धर शुक्ला याला ताब्यात घेऊन वर्तकनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणानंतर संबंधित चालकाला शिवसैनिकांनी धडा शिकवल्याचे काही व्हिडीओ देखील समोर आले आहेत. वृद्ध नागरिकावर झालेल्या हल्ल्याबद्दल संताप व्यक्त करत स्थानिक शिवसैनिकांनी तातडीने कारवाईची भूमिका घेतल्याचे दिसून आले.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी परप्रांतीय नागरिकांमध्ये वाढलेल्या मुजोरीसाठी येथील काही राजकीय पक्ष जबाबदार असल्याचा आरोप केला. एका वृद्ध व्यक्तीने सार्वजनिक स्वच्छतेसंदर्भात सूचना केल्यावर त्यांच्यावर हात उचलण्याचे धाडस कसे होते, असा सवाल उपस्थित करत अशा प्रवृत्तींना मनसेच्या पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा. २१ जागांसाठी ११ ऑक्टोबरला मतदान; तीन पॅनेलमध्ये तिरंगी लढत.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

मराठवाडा पदवीधर मतदार यादीत ‘उद्धव मस्के’ऐवजी उद्धव ठाकरे यांचे नाव आल्याचा दावा. दिलीप घुगे यांनी प्रशासनाकडे तक्रार केली.

Oct 05, 2026