हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याला भूकंपाचे हादरे ; ४.७ रिश्टर स्केलची नोंद

आज सकाळी मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याला भूकंपाचे हादरे बसले.

हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याला भूकंपाचे हादरे ; ४.७ रिश्टर स्केलची नोंद

Earthquake News

​नांदेड (Earthquake News) : आज सकाळी मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याला भूकंपाचे हादरे बसले. ११ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास हे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली.रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.७ इतकी मोजण्यात आली आहे.​ ​मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरली गावाच्या उत्तरेला आणि पांगरा शिंदे जवळील सोनवाडी परिसरात असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर  कुरे यांनी दिली आहे.हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील जमिनीच्या आत होणाऱ्या या हालचालींचे तीव्र पडसाद शेजारील नांदेड जिल्ह्यातही उमटले. नांदेड शहरासह परिसरात हे हादरे स्पष्टपणे जाणवले आहेत.

​​आज बसलेला हा धक्का मध्यम स्वरूपाचा असला तरी, सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त अद्याप मिळालेले नाही. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून नागरिकांनी घाबरून जावू नये असेआवाहन करण्यात आले आहे.

नांदेड शहराला भूकंपाचे अधुन - मधून धक्के जाणवण्याची घटना सन २००७ पासून सुरू आहे ३ मार्च २०२४ सायंकाळी ६ वाजून १८ मिनिटाला नांदेड शहराला १.५ रिश्टर स्केलचा धक्का जाणवला होता.त्यानंतर पुन्हा १८ दिवसांनी २१ मार्च २०२४ रोजी सकाळी नांदेड शहरासह जिल्ह्यात भूकंपाचे तीन धक्के जाणवले होते.तेव्हा पासून या भूकंपाच्या हादरे अधून मधून सुरूच आहेत.

​दरम्यान, गेल्या २ वर्षापासून नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील परिसरात वारंवार भूकंपाचे सौम्य हादरे बसत आहेत. वारंवार होणाऱ्या या भौगोलिक हालचालींमुळे नांदेड आणि हिंगोली परिसरातील नागरिक काहीसे चिंतेत आहेत.आज सकाळी हिंगोली आणि नांदेडला बसलेल्या हादऱ्यामुळे भीतीपोटी अनेकांनी घराबाहेर धाव घेतली होती.

संबंधित सामग्री

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत ४.५ आणि ३.३ तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के; वारंवारच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

Oct 03, 2026
भूकंपापासून संरक्षणासाठी हिंगोलीत ‘स्टॅबल’ तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग

भूकंपापासून संरक्षणासाठी हिंगोलीत ‘स्टॅबल’ तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग

Hingoli Earthquake Protection: भूकंपाच्या धक्क्यांपासून जुन्या व असुरक्षित इमारतींचे संरक्षण करण्यासाठी सीएसआयआर-केंद्रीय भवन अनुसंधान संस्थान रुडकी यांनी विकसित केलेल्या स्टॅबल तंत्रज्ञानाचा हिंगोली

Sep 24, 2026
पूराने उद्ध्वस्त नेपाळ पुन्हा हादरले; आठ दिवसांत भूकंपाचे तीन मोठे धक्के

पूराने उद्ध्वस्त नेपाळ पुन्हा हादरले; आठ दिवसांत भूकंपाचे तीन मोठे धक्के

Nepal Earthquake: विनाशकारी पूर आणि भूस्खलनाच्या संकटातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेपाळला रात्री पुन्हा एकदा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. रात्री 9 वाजून 38 मिनिटांनी 5.0 तीव्रतेचा भूकंप जाणवला

Sep 09, 2026
नाशिक पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले; पेठ, सुरगाणा आणि दिंडोरीत सौम्य हादरे

नाशिक पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले; पेठ, सुरगाणा आणि दिंडोरीत सौम्य हादरे

नाशिक जिल्ह्यात आज पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

Aug 17, 2026