परभणी व्यक्ती मृतदेह

परभणीतील थुना नदीपात्रात ५५ वर्षीय व्यक्तीचा आढळला मृतदेह

Parbhani Dead body: पूर्णा शहरालगतच्या थुना नदीच्या पात्रात एका ५५ वर्षीय व्यक्तीचा पाण्याने फुगलेला मृतदेह १२ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजेच्या पुर्वी आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

परभणीतील थुना नदीपात्रात ५५ वर्षीय व्यक्तीचा आढळला मृतदेह

Parbhani Dead body

 

पूर्णा शहराजवळील घटना; आकस्मिक मृत्यूची नोंद, मयत नांदेड येथील रहिवाशी

परभणी (Parbhani Dead body) : पूर्णा शहरालगतच्या थुना नदीच्या पात्रात एका ५५ वर्षीय व्यक्तीचा पाण्याने फुगलेला मृतदेह १२ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजेच्या पुर्वी आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मृतदेह पाण्यावर पालथ्या अवस्थेत तरंगत असून त्यातून दुर्गंधी येत असल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच पूर्णा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

मिळालेल्या माहितीनुसार, मयताची ओळख शेख हुसेन शेख इब्राहीम (वय ५५, रा. मुहम्मदीया कॉलनी, देगलूर नाका, इतवारा, नांदेड) अशी पटली आहे. पूर्णा शिवारातील गट क्रमांक ८८ मधील थुना  नदीपात्रात हा मृतदेह आढळून आला. स्थानिक शेतकरी कालिदास नागोराव कदम हे आपल्या शेतात गेले असता नदीपात्रातून तीव्र दुर्गंधी येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता पाण्यात मृतदेह तरंगताना दिसून आला.

त्यांनी तत्काळ पूर्णा पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. कालिदास कदम यांच्या खबरीवरून पूर्णा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची  नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चाऊस करीत असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

संबंधित सामग्री

माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

Livestock Electric Accidental Death: महावितरणच्या विद्युत वाहिन्या, खांब, रोहित्र किंवा अन्य विद्युत उपकरणांमुळे झालेल्या अपघातात पशुधनाचा मृत्यू झाल्यास शेतकरी आणि पशुपालकांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई

Oct 05, 2026
एसटी बसची दुचाकीला जोरदार धडकेत वृद्धाचा दुर्दैवी मृत्यु

एसटी बसची दुचाकीला जोरदार धडकेत वृद्धाचा दुर्दैवी मृत्यु

ST Bus Accidental Death: कांद्री परिसरातील नागपुर-जबलपुर महा मार्गावर पेट्रोल पंपासमोर एसटी महामंडळाच्या बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत ७० वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना

Sep 20, 2026
पावसाचा मोठा खंड पडल्याने आर्थिक विवंचनेतून उजनी येथील ४६ वर्षीय शेतकऱ्याची गोठ्यात गळफास लावून आत्महत्या

पावसाचा मोठा खंड पडल्याने आर्थिक विवंचनेतून उजनी येथील ४६ वर्षीय शेतकऱ्याची गोठ्यात गळफास लावून आत्महत्या

उजनी येथील ४६ वर्षीय शेतकरी श्रीमंत बिभीषण वळके यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली. कर्जबाजारीपणा आणि पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्याने ही घटना घडली.

Sep 13, 2026
अपघातात चौघांचा मृत्यू; पाच गंभीर जखमी

अपघातात चौघांचा मृत्यू; पाच गंभीर जखमी

Hingoli Accidental Death: वसमत तालुक्यातील कळंबा पाटीजवळ  सोमवारी दुपारच्या  सुमारास झालेल्या  ऑटोच्या भिषण अपघातात चौघांचा  मृत्यू झाला  असून पाचजण गंभीर  जखमी

Sep 07, 2026
नहाद येथील दाम्ंप्त्याचा मोटर सायकल अपघातात मृत्यू; एकाच चित्तेवर अंत्यसंस्कार

नहाद येथील दाम्ंप्त्याचा मोटर सायकल अपघातात मृत्यू; एकाच चित्तेवर अंत्यसंस्कार

Nahad Accidental death: कावड यात्रेचा महाप्रसाद घेऊन परत येत असताना नहाद शिवारात एका मोटर सायकल चालकाने त्यांच्या मोटर सायकलला दिलेल्या धडकेत दाम्ंप्त्यांचा मृत्यू झाला.

Sep 02, 2026