हिंगोली सोसायटीतून चंद्रकांत बांगर यांच्या नावाचा ठराव मंजूर; संचालकांचा सत्कार सोहळा उत्साहात

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून हिंगोली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

हिंगोली सोसायटीतून चंद्रकांत बांगर यांच्या नावाचा ठराव मंजूर; संचालकांचा सत्कार सोहळा उत्साहात

District Bank Election

हिंगोली (District Bank Election) : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून हिंगोली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. संस्थेच्या विशेष सभेत आमदार संतोष बांगर यांचे समर्थक चंद्रकांत गायबाजी बांगर यांच्या नावाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

या निर्णयानंतर आयोजित कार्यक्रमाला कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोषराव बांगर आणि शिवसेना संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी प्रमुख उपस्थिती लावली. यावेळी हिंगोली सोसायटीचे चेअरमन पंढरीनाथ बांगर, व्हॉइस चेअरमन दत्तराव बांगर तसेच नवनियुक्त प्रतिनिधी चंद्रकांत बांगर यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात युवा सेना जिल्हा प्रमुख राम कदम, शहर प्रमुख अशोकराव नाईक, नगरसेवक सुभाष बांगर, नगरसेवक गणेश बांगर, माजी जि.प. सभापती फकिरा मुंढे, चंदू लव्हाळे, भरत चौधरी, कपील खंडेलवाल, केशव दुबे, सुरेश शेळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वैजनाथ बांगर, सचिन बांगर, गंगाधर बांगर, संजय झाडे, शिवाजी बांगर, उमेश नागरे, प्रकाशराव बांगर तसेच संचालक, सभासद आणि शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार बांगर गटाने सहकार क्षेत्रात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केल्याचे या घडामोडीतून स्पष्ट होत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरील वर्चस्वासाठी सर्वच राजकीय गटांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

संबंधित सामग्री

आमदार संतोष बांगर यांच्या मागणीला यश; दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ होणार

आमदार संतोष बांगर यांच्या मागणीला यश; दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ होणार

MLA Santosh Bangar: महाराष्ट्रासह हिंगोली जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने कोरड्या दुष्काळाचे सावट पसरले असताना दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी व इतर शैक्षणिक परीक्षा शुल्क माफ करण्यात

Sep 30, 2026
श्री राजस्थान बाल गणेश मंडळाकडून भव्य अन्नदान

श्री राजस्थान बाल गणेश मंडळाकडून भव्य अन्नदान

हिंगोलीतील चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी राजस्थान बाल गणेश मंडळाकडून भव्य अन्नदान; लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Sep 26, 2026
संभाजीराव का बोलतात अमित देशमुखांविरोधात? लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून भाजपसमोर सवाल

संभाजीराव का बोलतात अमित देशमुखांविरोधात? लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून भाजपसमोर सवाल

लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून संभाजीराव पाटील निलंगेकरांची आक्रमक भूमिका चर्चेत. बँकेच्या कारभारावरून अमित देशमुखांवर आरोप आणि भाजपसमोर सवाल.

Sep 23, 2026
हिंगोलीच्या दसर्‍याचा खंड पडू देऊ नका: आ. संतोष बांगर

हिंगोलीच्या दसर्‍याचा खंड पडू देऊ नका: आ. संतोष बांगर

MLA Santosh Bangar: श्री सार्वजनिक दसरा महोत्सव सर्वदूर प्रसिध्द आहे. म्हैसूरनंतर हिंगोलीच्या दसर्‍याची ओळख आहे. त्यामुळे यावर्षीच्या दसर्‍यामध्ये प्रशासनाने खंड पडू देऊ नये

Sep 21, 2026
हिंगोलीच्या श्री जलेश्वर मंदिर व तलाव विकासासाठी 7 कोटींची मागणी; आ. संतोष बांगर यांचे पालकमंत्री झिरवाळ यांना निवेदन

हिंगोलीच्या श्री जलेश्वर मंदिर व तलाव विकासासाठी 7 कोटींची मागणी; आ. संतोष बांगर यांचे पालकमंत्री झिरवाळ यांना निवेदन

MLA Santosh Bangar: हिंगोली शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री जलेश्वर मंदिर व तलाव परिसराच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना सन 2026-27 मधून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार संतोष बांगर

Sep 08, 2026