लातूर जिल्हा परिषद

कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हा परिषदेत बैठक 

Latur Zilla Parishad: विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार दि. २५ व २७ मार्च २०२६ रोजी जिल्हा परिषद, लातूर अंतर्गत सर्व खातेप्रमुख आणि कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हा परिषदेत बैठक 

Latur Zilla Parishad

विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा; प्रश्न सोडविण्याचे आश्वासन

​लातूर (Latur Zilla Parishad) : विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार दि. २५ व २७ मार्च २०२६ रोजी जिल्हा परिषद, लातूर अंतर्गत सर्व खातेप्रमुख आणि कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सेवाविषयक समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष नागसेन कांबळे आणि सचिव किशोर गायकवाड यांनी आक्रमकपणे प्रश्न मांडले. हे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन (Latur Zilla Parishad) जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिले.

​​सामान्य प्रशासन विभागाने ऑनलाइन फाईल्स पेंडिंग राहण्याचा विषय निकाली काढणे, प्रशासकीय कामाचा वाढीव पदभार आणि कालबद्ध वेतनश्रेणी बहाल करणे. वित्त विभागाने जीपीएफचा लॉट किमान १५ दिवसांतून एकदा पाठवणे आणि सर्व्हिस बुक (सेवा पुस्तक) पडताळणी पूर्ण करणे यावर चर्चा करण्यात आली. ​(Latur Zilla Parishad) समाज कल्याण विभागाने कर्मचाऱ्यांचे समायोजन व पगार काढणे, कर्मचाऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवणे आणि सेवानिवृत्तीचे प्रस्ताव तातडीने निकाली काढावेत, ​पंचायत विभागाने हिंदी विषय माध्यमिक स्तरावर नसल्याने १०, २०, ३० वर्षांचा लाभ रोखून न धरण्याबाबत चर्चा झाली.

​शिक्षण विभाग: विद्यार्थ्यांना राजीव गांधी अपघात विमा लाभ देणे, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्ताव मंजूर करणे आणि रखडलेल्या पदोन्नती प्रक्रिया पूर्ण कराव्यात, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. या बैठकीत महासंघाचे विभागीय अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, मार्गदर्शक दिलीप जाधव, जिल्हा उपाध्यक्ष बळीराम गायकवाड, यशवंत माने, चंद्रकांत मोठेराव, रवी कुरील, अनिलकुमार नाईकवाडे इत्यादी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडले. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखारडे, लेखा विभागाचे प्रमुख श्री नागणे, समाजकल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. डी. वाघ, शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे इत्यादींनी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.

जि.प. पदाधिकाऱ्यांचा सत्कार

बैठकीनंतर महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने जि. प. अध्यक्षा उषाताई पाटील,  जि. प. उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती दयानंद सुरवसे, गट नेते रामभाऊ तिरुके यांचा सत्कार करण्यात आला.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026