Dadar Spa Raid

दादरमध्ये प्रसिद्ध मॉलमध्ये स्पा सेंटरच्या आडून देहविक्री? पोलिसांची धाड, ६ महिलांची सुटका

मुंबईतील दादर परिसरातील एका प्रसिद्ध मॉलमध्ये स्पा सेंटरच्या आडून देहविक्रीचा प्रकार सुरू असल्याचा आरोप समोर आला आहे.

दादरमध्ये प्रसिद्ध मॉलमध्ये स्पा सेंटरच्या आडून देहविक्री? पोलिसांची धाड, ६ महिलांची सुटका

Dadar Spa Raid

गुप्त माहितीच्या आधारे कारवाई; स्पा सेंटरच्या व्यवस्थापकासह ३ जणांना अटक, प्रकरणाचा पुढील तपास सुरू

मुंबईतील दादर परिसरातील एका प्रसिद्ध मॉलमध्ये स्पा सेंटरच्या आडून देहविक्रीचा प्रकार सुरू असल्याचा आरोप समोर आला आहे. याबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी संबंधित स्पा सेंटरवर छापा टाकला. कारवाईदरम्यान पोलिसांनी ६ महिलांची सुटका केली असून स्पा सेंटरच्या व्यवस्थापकासह तीन जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

पोलिसांना दादर येथील मॉलमधील एका स्पा सेंटरमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने सेंटरमध्ये प्रवेश करून कारवाई केली. तपासादरम्यान तेथील परिस्थिती समोर आल्यानंतर पोलिसांनी संबंधित महिलांना सुरक्षित बाहेर काढले. पोलिसांनी आत शिरकाव केल्यानंतर त्यांना ५ ते ३० वर्षांच्या ६ तरुणी नको त्या अवस्थेत आढळल्या.

या प्रकरणात स्पा सेंटरच्या व्यवस्थापकासह एकूण तीन जणांवर कारवाई करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिसांनी आवश्यक तपास केला असून या प्रकारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे.

दादर हा मुंबईतील कायम गजबजलेला परिसर असून येथे नोकरी, व्यवसाय, खरेदी तसेच वास्तव्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते. अशा ठिकाणी स्पा सेंटरच्या नावाखाली हा प्रकार सुरू असल्याचे समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

हा प्रकार नेमका किती काळापासून सुरू होता, यामध्ये आणखी किती व्यक्तींचा सहभाग आहे आणि या व्यवसायाची माहिती संबंधितांना कशी मिळाली, याबाबत आता पोलिसांकडून तपास केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

संबंधित सामग्री

 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून ३ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप; उर्वरित २५ हजार रुपये घेताना तिघांना अंधेरी पोलिसांनी अटक केली.

Oct 04, 2026
CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026
शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील CJPच्या विनापरवानगी आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई. अभिजीत दिपके यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल.

Oct 03, 2026
मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात अभिनेता डिनो मोरियाची पुन्हा चौकशी; 65.54 कोटींच्या गैरव्यवहाराचा तपास

मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात अभिनेता डिनो मोरियाची पुन्हा चौकशी; 65.54 कोटींच्या गैरव्यवहाराचा तपास

मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात डिनो मोरियाची EOWकडून पुन्हा चौकशी. 65.54 कोटींच्या कथित गैरव्यवहारात आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू.

Oct 02, 2026