ग्रेडर बेपत्ता, शेतकरी धान विक्रीच्या प्रतिक्षेत

ग्रेडर बेपत्ता, शेतकरी धान विक्रीच्या प्रतिक्षेत

Crop Damage Risk

अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी चिंताग्रस्त

एटापल्ली (Crop Damage Risk) : एटापल्ली पासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या उडेरा येथील आदिवासी विविध सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रावरील ग्रेडर गेल्या आठ दिवसापासून  बेपत्ता असल्याने धान विक्रीसाठी आणलेल्या शेतकर्‍यांच्या वाहनांच्या रांगा धान खरेदी केंद्रसमोर लागल्या आहेत. अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

उडेरा येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या मार्फत धान खरेदी करण्यात येत आहे. मागील १५ दिवसापासून धान खरेदी सुरू झाली आहे. मात्र फक्त एक आठवडा धान खरेदी करण्यात आली. धान खरेदी सुरू असल्याची माहिती मिळाल्याने परिसरातील शेतकर्‍यांनी लांब अंतरावरून ट्रॅक्टरच्या सहाय्याने धान विक्रीसाठी आणले. मात्र ग्रेडर आठ दिवसांपासून खरेदीसाठी न आल्याने शेतकर्‍यावर ट्रॅक्टरचा किराया बसत आहे. अशातच गेल्या दोन दिवसापासून ढगाळी वातावरण असल्याने अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे धान खराब होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. यामुळे तातडीने  धान खरेदी  करण्याची मागणी होत आहे.याबाबत संबधित ग्रेडर डांगे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. प्रादेशिक व्यवस्थापक अहेरी यांचेशी संपर्क साधला असता त्यांच्याशीही  संपर्क झाला नाही.

संबंधित सामग्री

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

Counterfeit Pesticide Market: देशातील कृषी क्षेत्रात बनावट कीटकनाशकांचा बाजार मोठ्या प्रमाणात विस्तारत असून, या बनावट उत्पादनांची उलाढाल तब्बल 11 हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याची धक्कादायक माहिती

Oct 05, 2026
बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यात कर्जबाजारीपणामुळे शंकर भारसाकळे यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत त्यांनी कर्ज आणि आर्थिक संकटाचा उल्लेख केल्याचे समोर आले.

Oct 03, 2026
धान खरेदी तातडीने सुरू करा व कोरेगाव–चोप रस्त्याची दुरुस्ती मागणी

धान खरेदी तातडीने सुरू करा व कोरेगाव–चोप रस्त्याची दुरुस्ती मागणी

Gadchiroli Paddy Procurement: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धान खरेदीसंदर्भात भेडसावणाऱ्या विविध समस्या तातडीने सोडवून धान खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात यावी, तसेच. धान खरेदी करणाऱ्या संस्था

Oct 02, 2026
चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवा

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवा

चंद्रपूर-गडचिरोलीतील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महेंद्र ब्राह्मणवाडे यांची पत्रकार परिषद; धान खरेदी, नुकसानभरपाई, महामार्ग व रोजगाराच्या मागण्या.

Sep 18, 2026
भारताकडे सर्वाधिक लागवडीयोग्य जमीन...मात्र चीनचे धान्य उत्पादन दुप्पट

भारताकडे सर्वाधिक लागवडीयोग्य जमीन...मात्र चीनचे धान्य उत्पादन दुप्पट

India Grain Production: ब्रिक्स देशांमध्ये भारताकडे सर्वाधिक सुमारे १५४ दशलक्ष हेक्टर लागवडीयोग्य जमीन असतानाही धान्य उत्पादकतेच्या बाबतीत भारत चीनच्या तुलनेत पिछाडीवर असल्याचे आकडेवारीतून समोर

Sep 11, 2026