अपहार प्रकरणी खेट्री सरपंचांवर संशय कायम?

अपहार प्रकरणी खेट्री सरपंचांवर संशय कायम?

Corruption Allegations

फेर चौकशीचे आदेश : आरोप गंभीर, विरोधक आक्रमक

पातूर (Corruption Allegations) : पंचायत समिती अंतर्गत खेट्री येथील सरपंच जहूर खान यांच्याविरोधातील कथित अपहार प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून, अपर आयुक्तांनी दिलेल्या फेर चौकशीच्या आदेशामुळे सरपंचांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गावातील विकास कामे प्रत्यक्षात न करता केवळ कागदोपत्री दाखवून लाखो रुपयांचे साहित्य खरेदी केल्याचा गंभीर आरोप उपसरपंचांसह ग्रामपंचायतीतील काही सदस्यांनी २०२३ मध्ये विभागीय आयुक्तांकडे दाखल केलेल्या याचिकेतून केला होता. या तक्रारीनंतर प्रकरण न्यायप्रविष्ट झाले होते.

दरम्यान, काही महिन्यांनंतर उपसरपंच व एका सदस्याने सरपंचांनी कोणताही गैरवापर केला नसल्याचे लेखी दिल्याने प्रकरणात वळण आले. मात्र, या बदललेल्या भूमिकेमुळे संशय अधिकच बळावल्याची चर्चा गावात रंगत आहे.

अपर आयुक्तांनी ९ मार्च २०२६ रोजी झालेल्या सुनावणीत या प्रकरणाची गंभीर दखल घेत, संपूर्ण बाबींची फेर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे प्रकरण अद्याप निकाली लागले नसून सरपंचांवरील आरोपांची छाया कायम आहे.

दरम्यान, सरपंचांना अपात्र ठरविण्यात आल्याची अफवा परिसरात पसरली होती. मात्र अधिकृत आदेशात तसे स्पष्ट नसल्याने ते अद्याप पदावर कायम आहेत. तरीही, या संपूर्ण प्रकरणामुळे ग्रामस्थांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण आहे.
 
विरोधकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, "गावाच्या विकासाच्या नावाखाली झालेल्या कथित गैरव्यवहाराचा पर्दाफाश व्हायलाच हवा," असा सूर उमटत आहे.

"माझ्यावरचे आरोप बिनबुडाचे असून राजकीय हेतूने लावले आहेत," असा दावा सरपंच जहूर खान यांनी केला असला तरी, फेर चौकशीच्या आदेशामुळे त्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

संबंधित सामग्री

शी जिनपिंग यांना दोन वेळा हृदयविकाराचा झटका?, उत्तराधिकारी जाहीर केल्यास तख्तापलटाची भीती

शी जिनपिंग यांना दोन वेळा हृदयविकाराचा झटका?, उत्तराधिकारी जाहीर केल्यास तख्तापलटाची भीती

Chinese President Xi Jinping: चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या प्रकृतीबाबत आणि चीनमधील अंतर्गत सत्तासंघर्षाबाबत खळबळजनक दावा, जिनपिंग यांना गेल्या काही काळात दोन वेळा स्ट्रोक आल्याचा दावा

Sep 06, 2026
लेकीच्या आक्षेपार्ह वक्तव्याने मुख्यमंत्र्यांशी वाद; नेत्याला मंत्रिपद गमावण्याची वेळ?

लेकीच्या आक्षेपार्ह वक्तव्याने मुख्यमंत्र्यांशी वाद; नेत्याला मंत्रिपद गमावण्याची वेळ?

Konda Sushmita Patel: या वादाची सुरुवात कोंडा सुरेखा यांच्या कन्या कोंडा सुष्मिता पटेल यांच्या कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे झाल्याचे समोर आले आहे. सुष्मिता पटेल यांनी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी...

Sep 04, 2026
आमदार संतोष बांगर यांच्या कावड यात्रेत हिंदू- मुस्लीम ऐक्याचे दर्शन

आमदार संतोष बांगर यांच्या कावड यात्रेत हिंदू- मुस्लीम ऐक्याचे दर्शन

MLA Santosh Bangar: शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी निघणाऱ्या भव्य कावड यात्रेत यंदाही हिंदू-मुस्लीम ऐक्याचे विलोभनीय दर्शन घडले.

Aug 25, 2026
लातूर महापालिका सभेविषयी मुख्यमंत्र्यांना गाऱ्हाणे; मंजूर विषयांची अंमलबजावणी थांबविण्यासाठी काकडे! 

लातूर महापालिका सभेविषयी मुख्यमंत्र्यांना गाऱ्हाणे; मंजूर विषयांची अंमलबजावणी थांबविण्यासाठी काकडे! 

CM Devendra Fadnavis: लातूर महानगरपालिकेमध्ये 5 ऑगस्ट रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवरील विषयावर लोकप्रतिनिधींना पुरेशी चर्चा व आपली भूमिका मांडण्याची संधी न देताच सर्व विषय मंजूर

Aug 19, 2026
'मंत्री-प्रशासनाची मुले बाकावर, आमची मुले जमिनीवर का?'

'मंत्री-प्रशासनाची मुले बाकावर, आमची मुले जमिनीवर का?'

CJP Abhijit Deepke: जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरावस्था पाहून संताप व्यक्त करत कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी शासन- प्रशासनाला थेट इशारा दिला आहे.

Aug 19, 2026