Compensation

महाळंग्रा येथील शेतकरी कुटुंबाला शासकीय मदत; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ₹3.80 लाखांचा धनादेश सुपूर्द

चाकूर तालुक्यातील महाळंग्रा येथील शेतकरी शिवाजी शिंदे यांचे विजेचा धक्का बसल्याने दुर्दैवी निधन झाले होते.

महाळंग्रा येथील शेतकरी कुटुंबाला शासकीय मदत; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ₹3.80 लाखांचा धनादेश सुपूर्द

Compensation

चाकूर : चाकूर तालुक्यातील महाळंग्रा येथील शेतकरी शिवाजी शिंदे यांचे विजेचा धक्का बसल्याने दुर्दैवी निधन झाले होते. या संकटसमयी शिंदे कुटुंबाला शासनाकडून आर्थिक दिलासा मिळाला आहे. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे महावितरणच्या वतीने मंजूर करण्यात आलेला ३ लाख ८० हजार रुपयांचा मदत निधी धनादेशाच्या स्वरूपात त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला.

शेतकरी शिवाजी शिंदे यांच्या निधनानंतर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. तसेच शासनाकडून सर्वतोपरी आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला.

या पाठपुराव्याला यश येत महावितरणकडून ३ लाख ८० हजार रुपयांचा मदत निधी मंजूर करण्यात आला. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते हा धनादेश शिंदे यांच्या वारसांना सुपूर्द करण्यात आला.

यावेळी महावितरणचे उपविभागीय अभियंता कुणाल पेन्सलवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, समाज कल्याण सभापती उत्तमराव माने यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

संबंधित सामग्री

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026