चिखलीत वानर हल्ला

चिखलीत वानराच्या धक्क्याने महिला छतावरून कोसळली, गंभीर जखमी

Chikhali Monkey Attack: चिखली येथे वानराच्या धक्क्याने छतावरील महिला खाली कोसळली. गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचार बाळापूर व नांदेड येथे केला जात आहे.

चिखलीत वानराच्या धक्क्याने महिला छतावरून कोसळली, गंभीर जखमी

Chikhali Monkey Attack

आखाडा बाळापूर (Chikhali Monkey Attack) : कळमनुरी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात वानरांच्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. चिखली येथे छतावर गेलेल्या महिलेला वानराने अचानक धक्का दिल्याने ती खाली कोसळून गंभीर जखमी झाली. जखमी महिलेवर प्रथम बाळापूर येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे, अशी माहिती बाजार समिती संचालक अमोल चव्हाण व नागोराव चव्हाण यांनी दिली.

कळमनुरी तालुक्यातील शेतशिवारात आणि गावोगावी वानरांचा उपद्रव वाढला आहे. उन्हाळ्यामुळे शेतशिवारातील पाणीसाठे आटले असून खाण्यासाठी पिकेही शिल्लक नसल्याने वानरांच्या टोळ्या गावातील घरांच्या छतावर, पत्र्यावर धुमाकूळ घालत आहेत. उन्हाळ्यात छतावर वाळत घातलेल्या कुरडया, पापड, शेवया व इतर खाद्यपदार्थ खाणे, नासधूस करणे, तसेच अनेकदा घरातून भाकरी व इतर साहित्य उचलून नेण्याचे प्रकार घडत आहेत.

दरम्यान, मंगळवारी (Chikhali Monkey Attack) चिखली येथील नंदाबाई संतोष चव्हाण (वय 40) या छतावर गेल्या असता अचानक वानराने त्यांना धक्का दिला. त्यामुळे त्या छतावरून खाली कोसळून गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने बाळापूर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. मार गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात हलवण्यात आल्याचे बाजार समिती संचालक अमोल चव्हाण यांनी सांगितले. यापूर्वीही आखाडा बाळापूर येथे क्लासला जाणाऱ्या एका लहान विद्यार्थ्याच्या हाताचा वानराने अचानक चावा घेऊन त्याला जखमी केले होते.

संबंधित सामग्री

आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

ज्ञानेश कुमार यांचा छत्तीसगड दौरा स्थगित झाला असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Oct 07, 2026
प्रेमानंद महाराजांचे आश्रम पुन्हा चर्चेत; मुलगा आणि महिला बेपत्ता...?

प्रेमानंद महाराजांचे आश्रम पुन्हा चर्चेत; मुलगा आणि महिला बेपत्ता...?

Premanand Maharaj Ashram: प्रेमानंद महाराजांच्या राधा केलि कुंज आश्रमाशी संबंधित काही घटनांमुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. आश्रमात आलेला 17 वर्षीय अनुज चौधरी हा मुलगा बेपत्ता झाल्याचा दावा

Oct 04, 2026
महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात; पुढील २ ते ३ दिवसांत संपूर्ण राज्यातून माघार घेण्याची शक्यता

महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात; पुढील २ ते ३ दिवसांत संपूर्ण राज्यातून माघार घेण्याची शक्यता

महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात झाली आहे. मुंबईसह काही भागांतून माघार; पुढील २-३ दिवसांत संपूर्ण राज्यातून मान्सून परतण्याची शक्यता.

Oct 03, 2026
नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
नांदेडमध्ये प्रशासन अलर्ट! सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

नांदेडमध्ये प्रशासन अलर्ट! सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

नांदेड जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन २ ते ४ ऑक्टोबरच्या सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Oct 01, 2026