चिखली अर्बन बँक

दि. चिखली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.२०२६ ते २०३१ या ५ वर्षांच्या कालखंडासाठी..

Chikhli Urban Bank: चिखली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची २०२६ ते २०३१ या कालखंडासाठी अविरोध निवड झाली. सतीश गुप्त यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका पार पडल्या.

दि. चिखली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.२०२६ ते २०३१ या ५ वर्षांच्या कालखंडासाठी..

Chikhli Urban Bank

सतीश गुप्त यांच्या नेतृत्वाखाली १५ संचालकांची अविरोध निवड

बुलढाणा (Chikhli Urban Bank) : विदर्भातील सहकार क्षेत्रात कामकाजाचा वेगळा ठसा उमटविणार्‍या दि. चिखली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. चिखलीच्या संचालक मंडळाची २०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या कालखंडासाठी होणारी निवडणूक अखेर अविरोध पार पडली. सहकार क्षेत्रात निवडणुका म्हटल्या की ईर्षा आणि चुरस आलीच, मात्र चिखली अर्बन बँकेने आपली प्रदीर्घ काळापासून चालत आलेली अविरोध निवडणुकीची परंपरा यंदाही कायम राखून जिल्ह्याच्या सहकार वर्तुळात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या प्रक्रियेत बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी महत्त्वाची व निर्णायक भूमिका बजावली. त्यांनी बँकेच्या ज्येष्ठ व मार्गदर्शक मंडळींच्या अनुभवाचा आधार घेत आणि सर्व स्तरावरील घटकांना योग्य प्रतिनिधित्व देत, एक सर्वसमावेशक उमेदवार फळी निश्चित केली. यामुळेच ही निवडणूक अविरोध होण्याला मदत झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण यांनी या (Chikhli Urban Bank) निवडणुकीचा अधिकृत निकाल प्रसिद्ध केला असून, यामध्ये विविध मतदारसंघांमधून १५ जणांची अविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. या नूतन संचालक मंडळामध्ये सतीश भगवानदास गुप्त, अभिजित नारायणसिंह राजपूत, श्यामसुंदर चंपालाल पारीख, आशुतोष सतीश गुप्त, मनीष सितलदास गुरुदासानी, नरेंद्र रमेशचंद्र लढ्ढा आणि अमोल अशोकराव खेकाळे हे सर्वसाधारण 'अ' मतदारसंघातून निवडून आले.

तसेच सर्वसाधारण 'ब' मतदारसंघातून पुसाराम आसाराम मुंडा, अमित पुखराज जैन (बेगाणी) आणि पियुष मदनगोपाल पुरोहित यांची निवड झाली आहे. महिलांच्या सक्षम प्रतिनिधित्वासाठी राखीव जागांवर सुषमा राजेंद्र शेटे आणि शीतल सतीश शेळके यांनी यश मिळवले आहे. सामाजिक समतोल राखण्याच्या दृष्टीने राखीव असलेल्या इतर प्रवर्गांमधून अनिल जगदेव सौदागर (अनुसूचित जाती/जमाती), अनिल देवआप्पा औटी (इतर मागासवर्गीय) आणि पंकज पंजाबराव इलग (भटक्या जाती जमाती / विशेष मागास प्रवर्ग) यांची संचालक म्हणून वर्णी लागली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे दि चिखली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे नाव पुन्हा एकदा संपूर्ण विदर्भात अभिमानाने घेतले जात असून नवनियुक्त संचालक मंडळाचे अभिनंदन होत आहे.

बँकेचा विश्वास आणि प्रगतीचा वारसा अधिक वृद्धिंगत करणार : सतीश गुप्त

सहकार क्षेत्रात सतत काम करत असताना अनेक संकटातून जावे लागते. ठेवीदारांचा विश्वास आणि कर्जदारांना कर्जाचे वाटप करणे हा समतोल राखून काम करावे लागते. वेळप्रसंगी थकीत कर्ज वसुलीसाठी कठोर पाऊले देखील उचलावी लागतात. परंतु बँकेच्या हितासाठी आणि बँकेशी सलग्नीत असलेल्या सर्व घटकांना सोबत घेत आपण यापुढे काम करत राहणार असून बँकेची निवडणूक अविरोध करण्यासाठी सहकार्य करणार्‍या सर्वांचा विश्वास सार्थ ठरवणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी  बोलताना सांगितले. सहकार क्षेत्रात काम करताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो.

विशेषत: ठेवीदारांचा विश्वास जपणे आणि कर्जदारांना वेळेवर अर्थपुरवठा करणे, या दोन्ही गोष्टींचा समतोल राखणे ही मोठी जबाबदारी असते. ही निवडणूक अविरोध होणे ही संस्थेच्या एकतेचे आणि सभासदांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. ही प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणार्‍या सर्व पदाधिकारी, संचालक आणि हितचिंतकांचे ऋणही त्यांनी व्यक्त केले. आगामी काळातही बँकेची आर्थिक शिस्त कायम राखण्यावर आणि सर्वसामान्य ठेवीदारांच्या पैशांच्या सुरक्षेसाठी पारदर्शक कारभारावर आपला भर असेल. बँकेशी निगडित असलेला प्रत्येक घटक हा कुटुंबातील सदस्याप्रमाणे असून सर्वांना सोबत घेऊन बँकेला प्रगतीच्या नव्या शिखरावर नेण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही सतीश गुप्त यांनी यावेळी सांगितले.

बँकेच्या (Chikhli Urban Bank) प्रगतीचा आलेख चढता ठेवण्यासाठी आणि ग्राहकांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सतीश गुप्त यांच्या नेतृत्वाखालील या नवीन मंडळाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. चिखली शहरासह  जिल्ह्यातून या नूतन संचालकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.यामुळे बँकेची प्रशासकीय पकड मजबूत झाली असून ही बँक सहकार क्षेत्रात नवनवीन शिखरे पादाक्रांत करेल, असा विश्वास  व्यक्त केला जात आहे.

संबंधित सामग्री

जिल्हा स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था फेडरेशनवर भाजपाचे उमेश नागरे यांची बिनविरोध निवड

जिल्हा स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था फेडरेशनवर भाजपाचे उमेश नागरे यांची बिनविरोध निवड

BJP Umesh Nagre: हिंगोलीच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठीच्या निवडणूक प्रक्रियेत भाजपचे जिल्हा सरचिटणीस उमेश नागरे यांची संचालकपदी बिनविरोध निवड

Jul 17, 2026
चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी समाधान सुपेकर यांची बिनविरोध निवड

चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी समाधान सुपेकर यांची बिनविरोध निवड

बुलढाणा जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील महत्त्वाच्या चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची निवड गुरुवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

Jun 13, 2026
चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली विधान परिषदेत अरुण लखानींचा बिनविरोध विजय

चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली विधान परिषदेत अरुण लखानींचा बिनविरोध विजय

महायुतीच्या नेत्यांकडून महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, असे आवाहन सातत्याने करण्यात येत होते.

Jun 04, 2026
कोरेगाव ग्रा.पं. पोटनिवडणुकीत पाच सदस्य बिनविरोध

कोरेगाव ग्रा.पं. पोटनिवडणुकीत पाच सदस्य बिनविरोध

दसाईगंज तालुक्यातील कोरेगाव ग्रामपंचायतीमध्ये गेल्या वर्षी २१ फेब्रुवारी रोजी मोठे राजकीय वादळ उठले होते.

Apr 23, 2026
रिसोड तालुका माहेश्वरी संघटनेची कार्यकारिणी बिनविरोध जाहीर

रिसोड तालुका माहेश्वरी संघटनेची कार्यकारिणी बिनविरोध जाहीर

Risod Maheshwari Association: रिसोड तालुक्यातील माहेश्वरी संघटनेच्या कार्यकारिणीची निवड बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदी विनोद लढ्ढा आणि सचिवपदी श्याम पल्लोड यांची निवड झाली.

Apr 13, 2026