हिंगोली (BJP Umesh Nagre) : जिल्हा स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेचे फेडरेशन मर्यादित, हिंगोलीच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठीच्या निवडणूक प्रक्रियेत भाजपचे जिल्हा सरचिटणीस उमेश नागरे यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडी बद्दल आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजपा प्रदेश कार्यालयीन सहमंत्री भाऊराव देशमुख यांच्या हस्ते नागरे यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे,जिल्हा प्रवक्ता विलास गोरे,उपसभापती निखील बांगर,जिल्हा उपाध्यक्ष संतोष टेकाळे,गणेश शिंदे,संदीप वाकडे,विनायक महाराज,संतोष साबळे उपस्थित होते.जिल्ह्यातील स्वयंरोजगार क्षेत्रातील सहकारी संस्थांच्या बळकटीकरणाला अधिक गती मिळावी यासाठी तसेच सभासदांचे प्रलंबित प्रश्न आणि अडचणी सोडवण्यासाठी ते सकारात्मक व प्रभावीपणे काम करणार असल्याचे नागरे यांनी यावेळी सांगितले.
नागरे (BJP Umesh Nagre) यांच्या या निवडीबद्दल खासदार रामराव वडकुते, आमदार तान्हाजीराव मुटकुळे, आमदार डॉ.प्रज्ञाताई सातव,माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे,बाबाराव बांगर यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जिल्हा स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था फेडरेशनवर भाजपाचे उमेश नागरे यांची बिनविरोध निवड
BJP Umesh Nagre: हिंगोलीच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठीच्या निवडणूक प्रक्रियेत भाजपचे जिल्हा सरचिटणीस उमेश नागरे यांची संचालकपदी बिनविरोध निवड
BJP Umesh Nagre
संबंधित सामग्री
स्थानिक गुन्हे शाखेच्या आयत्या पिठावर रेघोट्या: म्हणे बॅटर्या चोरीत दोघांना पकडले
Hingoli District Court Theft:
हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयात भर दिवसा चोरी
Hingoli District and Sessions Court: जिल्ह्यात चोर्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आता तर चोरट्यांना पोलिसांचे भय वाटेनासे झाले आहे. हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयात चोरी
हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त यादीत; बारा उपाययोजना आणि सवलती लागू
Hingoli District Drought: राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून या तालुक्यातील शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी बारा उपाययोजना व सवलती लागू
जिल्हा दुष्काळाच्या चक्रात; घोषणेची प्रतीक्षा, ऑगस्ट पाठोपाठ सप्टेंबरमध्येही पावसाची दीर्घ दडी
Hingoli District Drought: एल निनो'चा इशारा आणि अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत पावसाने गाठलेली सरासरी या फेऱ्यात जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस व तूर
हिंगोलीत गणेशोत्सवात श्रींच्या स्थापनेत वाढ; ‘एक गाव, एक गणपती’ची संख्या मात्र घटली
हिंगोलीत यंदा १७१० ठिकाणी गणेश स्थापना झाली; मात्र ‘एक गाव एक गणपती’ची संख्या ३०५ वरून १९१ वर घटल्याने चिंता व्यक्त होत आहे.