चाकूर गाव वीजपुरवठा

चाकूर गाव अंधारात; 75 मोटारपंपांची वीजपुरवठा लाईन अनेक दिवसांपासून बंद

Chakur Electricity Supply: चाकूर गावातील वीजपुरवठा अनेक दिवसांपासून खंडित असल्याने संपूर्ण गाव अंधारात बुडाले आहे. तसेच सुमारे 75 कृषी मोटारपंपांची वीज लाईन बंद असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट

चाकूर गाव अंधारात; 75 मोटारपंपांची वीजपुरवठा लाईन अनेक दिवसांपासून बंद

Chakur Electricity Supply

 

शेतकऱ्यांची विज कंपनी कार्यालयावर धडक

मानोरा (Chakur Electricity Supply) : तालुक्यातील चाकूर गावातील वीजपुरवठा अनेक दिवसांपासून खंडित असल्याने संपूर्ण गाव अंधारात बुडाले आहे. तसेच सुमारे 75 कृषी मोटारपंपांची वीज लाईन बंद असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. पिकांना पाणी देणे अशक्य झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी  आक्रमक होत विज वितरण कंपनी कार्यालयावर धडक देत कृषी पंपाचा विज पुरवठा तातडीने तात्काळ सुरू करण्याची मागणी केली. 

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, महावितरणचे संबंधित अधिकारी गिरी हजर नसल्यामुळे समस्या अधिक गंभीर बनली आहे. त्यांचा मोबाईल फोनही बंद असल्याने शेतकऱ्यांना संपर्क साधता येत नाही. वारंवार तक्रारी करूनही वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आलेला नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या (Chakur Electricity Supply) समस्येबाबत संतप्त शेतकरी सब-स्टेशनवर दाखल झाले होते. त्यांनी तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. पावसाचा खंड पडलेला असताना वीज नसल्यामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

शेतकरी व ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून गावाचा व कृषी पंपांचा वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी केली आहे. यावेळी राजू चव्हाण, दिनेश मोरे, कैलास पाटील, पंजाब चव्हाण, बाळू जाधव, रवि राठोड, दिनेश राठोड, पप्पू राठोड. अनील राठोड, अजय राठोड, राम बोचट, ऋतिक राठोड आदी उपस्थित होते. 

संबंधित सामग्री

आसोला ग्रामस्थांना दोन विद्युत रोहित्र उपलब्ध; आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांना यश

आसोला ग्रामस्थांना दोन विद्युत रोहित्र उपलब्ध; आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांना यश

आसोला गावातील चार महिन्यांपासून जळालेले दोन विद्युत रोहित्र आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांतून उपलब्ध झाले. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

Sep 27, 2026
बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शंतनु बोंद्रे यांची मागणी

बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शंतनु बोंद्रे यांची मागणी

बुलढाण्यात पावसाअभावी खरीप पिके संकटात; कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासह दिवसा वीजपुरवठा व नादुरुस्त डीपी बदलण्याची शंतनु बोंद्रे यांची मागणी.

Sep 10, 2026
चाकूर गावामध्ये मूलभूत सुविधांचा बोजवारा; ग्रामस्थांचा प्रशासनाविरोधात संताप! 

चाकूर गावामध्ये मूलभूत सुविधांचा बोजवारा; ग्रामस्थांचा प्रशासनाविरोधात संताप! 

Chakur Basic Amenities: तालुक्यातील मौजा चाकूर येथे गेल्या अनेक वर्षांपासून विविध मूलभूत सुविधांचा अभाव असून ग्रामपंचायत माहुलीकडून गावाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला

Aug 06, 2026
माहुर तालुक्यातील रात्रीचे भारनियमन बंद करा : आ. भीमराव केराम

माहुर तालुक्यातील रात्रीचे भारनियमन बंद करा : आ. भीमराव केराम

आदिवासी बहुल आणि जंगलव्याप्त माहुर तालुक्यात १४ जुलैपासून महावितरणकडून रात्री ७.०० ते १०.३० वाजेपर्यंत करण्यात येत असलेल्या भारनियमनामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

Jul 16, 2026
अन्... रात्रीतून उभारला नवीन रोहित्र; सोनखेड परिसराचा वीजपुरवठा पूर्ववत

अन्... रात्रीतून उभारला नवीन रोहित्र; सोनखेड परिसराचा वीजपुरवठा पूर्ववत

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहरातील सोनखेड परिसरातील वीज रोहित्र (डीपी) दोन दिवसांपूर्वी जळाल्याने अर्धा सोनखेड तसेच तांडा परिसर अंधारात बुडाला होता.

Jun 28, 2026