चाकूर मूलभूत सुविधा

चाकूर गावामध्ये मूलभूत सुविधांचा बोजवारा; ग्रामस्थांचा प्रशासनाविरोधात संताप! 

Chakur Basic Amenities: तालुक्यातील मौजा चाकूर येथे गेल्या अनेक वर्षांपासून विविध मूलभूत सुविधांचा अभाव असून ग्रामपंचायत माहुलीकडून गावाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला

चाकूर गावामध्ये मूलभूत सुविधांचा बोजवारा; ग्रामस्थांचा प्रशासनाविरोधात संताप! 

Chakur Basic Amenities

 

पिण्याचे पाणी, रस्ते, गटार, शाळा व अंगणवाडीच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

मानोरा (Chakur Basic Amenities) : तालुक्यातील मौजा चाकूर येथे गेल्या अनेक वर्षांपासून विविध मूलभूत सुविधांचा अभाव असून ग्रामपंचायत माहुलीकडून गावाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात चाकूर येथील समस्त ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी, ज्योती राजपुरोहित यांच्याकडे दि. ६ ऑगस्ट रोजी निवेदन देऊन तातडीने स्थळ पाहणी करून आवश्यक विकासकामे मंजूर करण्याची मागणी केली आहे.

मौजे चाकूर गावात अंदाजे २५० ते ३०० मतदार असून हे गाव गट ग्रामपंचायत माहुली अंतर्गत येते. ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडे अनेक वेळा तोंडी तसेच लेखी स्वरूपात समस्या मांडूनही ठोस कार्यवाही झाली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावातील पिण्याच्या पाण्याची नळपाणी पुरवठा योजना बंद असल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच गावातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असून पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचत असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

गावात योग्य गटार व सांडपाणी निचरा व्यवस्था नसल्यामुळे बुद्ध विहार परिसरात सांडपाणी साचत असल्याने अस्वच्छता निर्माण झाली आहे. विविध ठिकाणी शेणखत व कचऱ्याचे ढीग साचल्याने दुर्गंधी पसरत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे. दरम्यान, जिल्हा परिषद शाळेतील किचन शेड जीर्ण व धोकादायक अवस्थेत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच गावातील अंगणवाडी इमारतही जीर्ण अवस्थेत असून लहान बालकांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या (Chakur Basic Amenities) सर्व समस्यांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून तसेच इतर उपलब्ध योजनांमधून तातडीने आवश्यक विकासकामे मंजूर करून पूर्ण करावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याशिवाय, ग्रामपंचायत माहुलीचे संबंधित ग्रामसेवक व सरपंच यांनी या समस्यांचे निराकरण आजपर्यंत का केले नाही, याबाबत लेखी खुलासा मागवून आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करावी अशी मागणे चाकूर वासियांनी पंचायत समिती संवर्ग विकास अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन केली.

संबंधित सामग्री

हिंगोली जिल्ह्यात पाऊस रुसला पावसाची मोठी तूट, ८२.९ मिमी पावसाची कमतरता

हिंगोली जिल्ह्यात पाऊस रुसला पावसाची मोठी तूट, ८२.९ मिमी पावसाची कमतरता

Hingoli Rainfall: जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिली असून जिल्ह्यात सध्या पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. २० ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यात एकूण सरासरी केवळ १०६.० मिमी पावसाची नोंद झाली

Aug 21, 2026
चान्नी–सुकळी फाटा मार्ग पुन्हा 'जैसे थे'; लाखोंचा खर्च पाण्यात

चान्नी–सुकळी फाटा मार्ग पुन्हा 'जैसे थे'; लाखोंचा खर्च पाण्यात

Channi–Sukali Road: पातूर तालुक्यातील चान्नी ते सुकळी फाटा या मुख्य मार्गाची मे महिन्यात करण्यात आलेली डागडुजी अवघ्या दोन महिन्यांतच निकामी ठरल्याचे चित्र समोर आले आहे. रस्त्यावर पुन्हा मोठमोठे खड्डे

Jul 22, 2026
पंधरा दिवसांपासून पाऊस गायब; पानकनेरगा गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई

पंधरा दिवसांपासून पाऊस गायब; पानकनेरगा गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई

सेनगाव तालुक्यातील पानकनेरगा परिसरात गेल्या महिनाभरापासून समाधानकारक पाऊस न झाल्याने गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्वराज्य योजनेअंतर्गत असलेल्या विहिरीची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे.

Jul 16, 2026