Cashew Almond Controversy

नांदेडच्या दुष्काळी बैठकीतील काजू-बदामावर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘प्रशासनाने संवेदनशीलपणे वागावे’

नांदेडच्या दुष्काळी बैठकीतील काजू-बदामाच्या मुद्द्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया; पंचनामे, शेतकरी मदत, पाणी, चारा आणि अतिरिक्त वीजबाबत माहिती.

नांदेडच्या दुष्काळी बैठकीतील काजू-बदामावर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘प्रशासनाने संवेदनशीलपणे वागावे’

Cashew Almond Controversy

दुष्काळग्रस्त भागात पुढील आठवडाभरात प्राथमिक आढावा आणि पंचनामे; शेतकऱ्यांना तातडीची मदत, पाणी, चारा आणि अतिरिक्त वीज देण्याची माहिती

नांदेडमध्ये मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या सरकारी बैठकीत काजू-बदाम ठेवण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या मुद्द्यावरून चर्चा सुरू झाली आहे. शेतकरी संकटात असताना मंत्री आणि अधिकारी ड्रायफ्रूट खात असल्याच्या मुद्द्यावरून काहींकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रशासनाने अशा बाबतीत अधिक संवेदनशीलता बाळगण्याची गरज असल्याचे सांगितले.

फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, सरकारी बैठकींमध्ये प्रशासनाकडून ड्रायफ्रूट आणून ठेवण्याची पद्धत काही ठिकाणी आहे. मात्र, दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. त्याचवेळी, दुष्काळ असल्यामुळे जाणीवपूर्वक अशा प्रकारे काजू-बदाम ठेवण्यात आले, असे म्हणणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संवेदनशीलपणे वागावे, असे त्यांनी म्हटले.

पिकांच्या नुकसानीचा पुढील आठवडाभरात आढावा

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अपुऱ्या पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा थेट परिणाम पिकांवर झाला आहे. पिकांचे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली असून प्रत्येक मंत्र्याला आपल्या जिल्ह्यात परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पुढील आठवडाभरात प्राथमिक पाहणी आणि पंचनामे करून त्यानुसार मदत करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

कर्जमाफीच्या याद्यांचे काम सुरू

दरम्यान, शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. आतापर्यंत तीन याद्या पूर्ण झाल्या असून उर्वरित काम वेगाने करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांना शक्य ती तातडीची मदत देण्याचे सरकारचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था केली जात आहे. अल निनोच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर वैरण विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. त्यामुळे ज्या भागात चाऱ्याची कमतरता भासेल, तिथे त्याची व्यवस्था करण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

शेतीसाठी अतिरिक्त वीज देण्याची व्यवस्था

शेतीसाठी संध्याकाळच्या वेळेत अतिरिक्त वीज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली असून, सर्व भागांत अतिरिक्त वीज दिली जात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ज्या भागातील विहिरींमध्ये पाणी उपलब्ध आहे, तेथील पिके वाचवण्यास मदत होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

दुष्काळी उपाययोजना राबवून शेतकऱ्यांना शक्य तितका दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

दुष्काळाच्या मुद्द्यावर विरोधकांकडून राजकारणाचा आरोप

दुष्काळी परिस्थितीच्या मुद्द्यावर विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. दुष्काळासंदर्भातील शासन निर्णय आणि त्यातील नियमांनुसार प्रक्रिया केल्यानंतरच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) मधून निधी मिळतो, असे त्यांनी सांगितले. मात्र, केंद्राकडून मदत मिळण्याची प्रक्रिया सुरू असतानाही राज्य सरकारकडून मदत देण्याचे काम थांबवले जात नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

ज्या भागांमध्ये विहिरींमध्ये पाणी आहे, तिथे रब्बी पिकांचे नियोजन करता येऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. कोणते भाग अत्यंत कोरडे आहेत, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोठ्या धरणांमध्ये पाणी; छोट्या धरणांची स्थिती चिंताजनक

यंदा मोठ्या धरणांमध्ये चांगला पाणीसाठा असला, तरी मराठवाड्यातील छोट्या धरणांमध्ये पाणी कमी असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. त्यामुळे अशा भागांमध्ये भविष्यात पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होऊ नये, यासाठी उपलब्ध पाणी राखून ठेवले जात आहे. मोठ्या धरणांमधील पाणीसाठाही जपून ठेवण्यात आला असून, पुढील अंदाज स्पष्ट होईपर्यंत आवश्यकतेनुसार राखीव पाणी पिण्यासाठी वापरण्याची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित सामग्री

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

MLA Shweta Mahale: बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व पशुपालकांसमोरील अडचणी लक्षात घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील

Oct 05, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
हिंगोलीत चारा, गवत व वैरण जिल्ह्याबाहेर नेण्यास बंदी; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे आदेश

हिंगोलीत चारा, गवत व वैरण जिल्ह्याबाहेर नेण्यास बंदी; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे आदेश

Hingoli Fodder Transport Ban: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील उपलब्ध हिरवा व वाळलेला चारा, गवत व वैरण जिल्ह्याबाहेर विक्री व वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे-जिल्हा प्रशासन

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026