धोकादायक पुलावरून जीवघेणी वाहतूक

शहरातील सावनेर-नागपूर बायपास रोडलगत असलेल्या देशमुख ले-आऊट, वॉर्ड क्र. १० मधील नाल्यावरील पुलाची अवस्था सध्या अत्यंत चिंताजनक झाली आहे.

धोकादायक पुलावरून जीवघेणी वाहतूक

Bridge Safety Issue​​​​​​​

कळमेश्वर, वॉर्ड क्र. १० मधील नाल्यावरील पुलाची अवस्था दयनीय, अपघातांचा धोका वाढला

कळमेश्वर (Bridge Safety Issue) : शहरातील सावनेर-नागपूर बायपास रोडलगत असलेल्या देशमुख ले-आऊट, वॉर्ड क्र. १० मधील नाल्यावरील पुलाची अवस्था सध्या अत्यंत चिंताजनक झाली आहे. हा अरुंद आणि वळणावरील पूल सध्या मृत्यूचा सापळा बनला असून, प्रशासनाच्या सततच्या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता आधी पुलाची दुरुस्ती करावी, अशी आक्रमक भूमिका संतप्त नागरिकांनी घेतली आहे.

या पुलाच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे वाढली आहेत, ज्यामुळे वळणावर समोरून येणारे वाहन चालकांना वेळेवर दिसत नाही. पुलावरील रस्ता अनेक ठिकाणी उखडला असून संरक्षक लोखंडी रेलिंगही पूर्णपणे जीर्ण झाली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी दिशादर्शक फलक आणि पुरेशा प्रकाशाअभावी वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून अपघाताचा धोका अनेक पटींनी वाढला आहे. केवळ वाहतूकच नव्हे, तर सार्वजनिक सुरक्षिततेचे इतर प्रश्नही येथे गंभीर आहेत. पुलाच्या अगदी शेजारी असलेला वीजवितरण बॉक्स उघडा आणि गंजलेल्या अवस्थेत आहे, जो नागरिकांच्या जीवावर बेतू शकतो. हा रहिवासी भाग असल्याने येथे लहान मुले नेहमी खेळत असतात. पुलाला मजबूत कठडा नसल्याने खेळताना मुले नाल्यात पडण्याची भीती पालकांकडून सतत व्यक्त केली जात आहे.

भविष्यातील दुर्घटनेला प्रशासनच जबाबदार

स्थानिक रहिवाशांनी नगर परिषद प्रशासनाकडे या संदर्भात वारंवार तक्रारी केल्या आहेत. झाडाझुडपांची छाटणी करणे, नवीन मजबूत रेलिंग बसवणे आणि उघड्या विद्युत यंत्रणेची दुरुस्ती करणे यांसारख्या प्राथमिक मागण्यांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. जर वेळेत ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात घडणाऱ्या दुर्घटनेला प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला आहे.

 

संबंधित सामग्री

राजुरा न्यायालयासमोर दिवसाढवळ्या गोळीबार; ‘पापा’ जाधवची हत्या

राजुरा न्यायालयासमोर दिवसाढवळ्या गोळीबार; ‘पापा’ जाधवची हत्या

Papa Jadhav murder: राजुरा न्यायालयासमोर प्रदीप बारजवळ सोमवारी सायंकाळी दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याने शहरात खळबळ उडाली. अज्ञात हल्लेखोरांनी सोमनाथपूर वॉर्डातील विनोद उर्फ ‘पापा’ जाधव यांच्यावर गोळीबार

Aug 24, 2026
गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवरील मुख्य मार्गावर रहदारी धोकादायक

गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवरील मुख्य मार्गावर रहदारी धोकादायक

कोरची तालुक्यापासून 9 कि.मी. अंतरावर असलेल्या कोटरा, माहाका, हितापाडी, मिसपिरी ते मकेंकसा या 3 कि.मी. रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

Aug 12, 2026
लातूर-औसा महामार्गावर पडल्या भेगा!

लातूर-औसा महामार्गावर पडल्या भेगा!

नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील लातूर ते औसा रस्त्यावर ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत.

Aug 09, 2026
‘देशोन्नती’चा दणका: पातूरच्या रेस्ट हाऊस रस्त्यावरील ‘त्या’ जीवघेण्या खड्ड्यावर प्रशासन जागे

‘देशोन्नती’चा दणका: पातूरच्या रेस्ट हाऊस रस्त्यावरील ‘त्या’ जीवघेण्या खड्ड्यावर प्रशासन जागे

Patur Road Pothole: या बातमीची गंभीर दखल घेत प्रशासकीय यंत्रणा तातडीने हरकतीत आली असून, रविवारी/सोमवारी जेसीबी, यंत्रसामग्री आणि कर्मचाऱ्यांच्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल होऊन खड्ड्यामध्ये मुरूम व खडी.

Jul 28, 2026
घोट–रेगडी मार्गाच्या दुरवस्थेवर राष्ट्रीय मानवाधिकार संघटना आक्रमक; तातडीने दुरुस्तीची मागणी

घोट–रेगडी मार्गाच्या दुरवस्थेवर राष्ट्रीय मानवाधिकार संघटना आक्रमक; तातडीने दुरुस्तीची मागणी

Ghot-Regdi Road: घोट–रेगडीमार्गाचे दुरुस्ती करण्याचा आक्रमक मागणी राष्ट्रिय मानवाधिकार सांस्थाने करून, पावसामुळे बनलेल्या खड्ड्यांचा समाधान न करता त्वरित उपायाची मागणी केली गेल्या

Jul 08, 2026