बुलढाणा (Farmers Diesel Demand ) : खरीप हंगाम तोंडावर आला असून जिल्ह्यात नांगरणी व मशागतीची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याने मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. या प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चा बुलढाणा जिल्हाध्यक्ष संतोष काळे पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सुरक्षेच्या कारणास्तव अनेक पेट्रोल पंपचालक वाहनांच्या टाकीतच डिझेल भरत असून कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार देत आहेत. त्यामुळे शेतात काम करणारा ट्रॅक्टर पंपावर नेण्यासाठी शेतकऱ्यांना काम थांबवून २ ते ३ तास खर्च करावे लागत आहेत. यामध्ये वेळ व डिझेल दोन्हीचा अपव्यय होत असून वेळेत मशागत न झाल्यास खरीप हंगामावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरची आर.सी. बुक दाखवल्यानंतर दररोज किमान तीन हजार रुपयांपर्यंतचे (Farmers Diesel Demand) डिझेल कॅनमध्ये देण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच नाफेड केंद्रांवर मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक सुरू असून वाहतुकीसाठी आवश्यक डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांना लेखी आदेश देऊन जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या माध्यमातून अंमलबजावणी करावी, अशी विनंती प्रशासनाकडे करण्यात आली. निवेदनाच्या प्रती जिल्हा पुरवठा अधिकारी यांनाही देण्यात आल्या आहेत.
“शेती हा राज्याचा कणा असून शेतकरी जगला तर देश जगेल. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,” अशी भावना निवेदनकर्त्यांनी व्यक्त केली.
यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष काळे पाटील, उपाध्यक्ष विशाल विसपुते, नीरज गायकवाड, बंडूभाऊ अंभोरे, वैभव लाड, पंढरीभाऊ गावंडे, दत्ताभाऊ शेवाळे, पंजाबराव देशमुख, सतीश गावंडे, दीपक पाटील भाकडे, वसुदेव राजपूत, फकीर कराडे, निलेश मुठ्ठे, अजय खराटे, करण बेंडवाल, प्रतीक गायकवाड, कार्तिक गावडे, मंगल वाघमारे यांच्यासह भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल मिळावे; भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Farmers Diesel Demand : भाजपा युवा मोर्चा बुलढाणा जिल्हाधिकारीकडे निवेदन करून शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करावे म्हणून मागणी केली. खरीप हंगामात डिझेल
Farmers Diesel Demand
संबंधित सामग्री
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’
महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्सव साधेपणाने साजरे करून निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वापरण्याचं आवाहन केलं.
ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या
ब्राह्मणवाडा येथील ५९ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी तानाजी मोरे यांनी नापिकीच्या चिंतेत विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मलकापूर तालुक्याच्या दुष्काळी वेदनेला मिळाला दिलासा; आ. चैनसुख संचेतींच्या पाठपुराव्याला यश
बुलढाण्यातील सर्व १३ तालुके दुष्काळग्रस्त यादीत; ‘ट्रिगर-१’ लागू. आमदार चैनसुख संचेतींच्या पाठपुराव्याला यश.
बुलढाणा जिल्ह्यात सरसकट नुकसानभरपाई द्या; शेतकऱ्यांसह देविदास कणखर, विनायक सरनाईक यांची पालकमंत्र्यांकडे मागणी
Buldhana district dry drought: जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप पिके संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत पालकमंत्री मकरंद जाधव पाटील
महाराष्ट्रातील दुष्काळाच्या निकषांमध्ये बदल; ३३ टक्क्यांहून अधिक पीकनुकसान असल्यास गाव दुष्काळी घोषित होण्याची शक्यता
महाराष्ट्रातील दुष्काळाच्या मूल्यांकनासाठी सुधारित निकष; पर्जन्यमानासोबत पीकनुकसान, मृदा आर्द्रता, भूजल पातळी व इतर घटकांचा विचार होणार.