बिबट हल्ला

बिबट्याचा हल्ला; शेळी व बोकड ठार, शेतकऱ्याचे सुमारे 40 हजारांचे नुकसान

Leopard Attack: कोरेगावमध्ये बिबट्याने शेळी व बोकडवर हल्ला करून त्यांना ठार मारले, यात भिवा सहारे यांचे अंदाजे 40 हजाराचे नुकसान झाले आहे.

बिबट्याचा हल्ला; शेळी व बोकड ठार, शेतकऱ्याचे सुमारे 40 हजारांचे नुकसान

Leopard Attack

कोरेगाव, चोप/गडचिरोली (Leopard Attack) : देसाईगंज तालुक्यातील रावनवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी व बोकड ठार झाल्याची घटना घडली असून, यामध्ये शेतकरी भिवा सहारे यांचे सुमारे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रावनवाडी येथील भिवा सहारे यांनी आपली शेळी व बोकड चोप येथील स्मशानभूमीजवळ चारण्यासाठी नेले होते. दरम्यान, सकाळी सुमारे 10.30 वाजण्याच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात शेळी आणि बोकड ठार झाले.

या (Leopard Attack) घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकरी व नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. दिवसा उजेडात झालेल्या या घटनेमुळे वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. शंकरपूर येथील क्षेत्र सहाय्यक मोहुर्ले तसेच वनरक्षक कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास वनविभागाकडून सुरू आहे.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी वनविभागाने तातडीने उपाययोजना करून (Leopard Attack) बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. तसेच, नुकसानग्रस्त शेतकऱ्याला त्वरित आर्थिक मदत देण्याचीही मागणी होत आहे. वनविभागाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून, जनावरांना जंगलाच्या किंवा निर्जन भागात एकटे सोडू नये, असे सांगितले आहे.

संबंधित सामग्री

चोप-कोरेगाव रस्ता बनत आहे जिव घेना!

चोप-कोरेगाव रस्ता बनत आहे जिव घेना!

Chop-Koregaon road: देसाईगंज तालूक्यातील शंकरपूर ते बोळधा येथील जानेवारी 2024 ला (बिडींग )रस्ता रुंदी करण्याचे कामाला सुरवात झाली तेव्हा पासुन अपघातात 3 लोकांचे बळी गेले...

Sep 17, 2026
मोडकळीस आलेल्या खोलीत बनते मध्यान्ह भोजन

मोडकळीस आलेल्या खोलीत बनते मध्यान्ह भोजन

गडचिरोलीतील कोरेगाव जिल्हा परिषद शाळेची इमारत मोडकळीस आली असून, पडक्या खोलीत मध्यान्ह भोजन बनविले जात असल्याने पालकांमध्ये असंतोष आहे.

Sep 17, 2026
हिंगोली  शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे हरणाच्या पाडसाचे प्राण वाचले  

हिंगोली शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे हरणाच्या पाडसाचे प्राण वाचले  

Hingoli Deer Rescue: कळमनुरी तालुक्यातील कोंढुर डिग्रस येथे २६ जून रोजी  हृदयस्पर्शी घटना घडली. शेतकरी गजाननराव पंतगे आपल्या शेतात हळदीची लागवड करीत असताना रानटी कुत्र्यांच्या एका कळपाने हरणाच्या पाडस

Jun 28, 2026
पहिल्याच पावसात वलनी येथे वीज कोसळून बैलाचा मृत्यू; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

पहिल्याच पावसात वलनी येथे वीज कोसळून बैलाचा मृत्यू; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

Bull Lightning Death: सावनेर तालुक्यातील वलनी गावात, पहिल्या पावसाच्या दिवशी वीज कॉसळून शेतकरी महादेव शिवारऊके यांच्या बैलाचा मृत्यू. दोन महिन्यापूर्वी १ लाख २० हजाराची बेलांची जोडी घेतली होती.

Jun 22, 2026
Father's Day ला धाडसी पित्याची शौर्यगाथा! लेकीला वाचवण्यासाठी बिबट्याशी झुंज; जीव वाचवताना बाप-लेक विहिरीत कोसळले

Father's Day ला धाडसी पित्याची शौर्यगाथा! लेकीला वाचवण्यासाठी बिबट्याशी झुंज; जीव वाचवताना बाप-लेक विहिरीत कोसळले

अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने फादर्स डेच्या दिवशी पित्याच्या निस्वार्थ प्रेमाची आणि धाडसाची प्रचिती दिली.

Jun 21, 2026