कोरेगाव, चोप/ गडचिरोली (Chop-Koregaon road) : देसाईगंज तालूक्यातील शंकरपूर ते बोळधा येथिल जानेवारी 2024 ला (बिडींग )रस्ता रुंदी करण्याचे कामाला सुरवात झाली तेव्हा पासुन अपघातात 3 लोकांचे बळी गेले. नोहेंबर 2024 ला दिवाळी निमीत्य काम बंद केला तो आज पर्यंत सुरुच नाही झाला.
जिल्हा मार्ग क्र. 1 हा रस्ता वरदळीचा असुन चोप, कोरेगाव, बोळधा, रावणवाडी तर गोंदीया जिल्हा महागाव केशोरी या मार्गावर वाहतुक 24 तास चालत असते त्या नुसार या मार्गाचे रूंदीकरण सुरु झाले शंकरपूर ते चोप हा 3 किमी चा रस्ता रुंदी करण करण्यात आला चोप - ते - कोरेगाव रस्त्याला जानेवारी 2024 ला सुरवात झाली पंरतू हा रस्ता अजुनही अपूर्ण अवस्थेत आहे या मार्गावर अपघातात 3 नागरीकांना जिव गमवावे लागले तर अणेक छोट्या मोठ्या अपघातात दीर्घकालीन अपंगत्व झाले तर काही किरकोळ कोरेगाव येथे प्राथमीक आरोग्य केंन्द आहे महाविद्यालय शाळा आहे, व्यवसाईक दुकाने आहेत परीसरातील नागरीक याच मुख्य रस्त्या चा उपयोग करतात.
अनेकदा सां.बा. विभाग व लोकप्रतीनीधींना बोलून सुध्दा उडवाउडवीचे उत्तर मिळत असल्याने परीसरातील नागरीकांत असंतोष निर्माण झाला असुन आंदोलना चा इशारा दिला आहे. लोकप्रतीनिधी व संबंधीत विभागाने या रस्त्याला वाडीत टाकले की काय, या दिड किमी रस्ता रोकने ही बाब योग्य नाही पून्हा किती बळी हवेत तर रस्ता बनेल असा सवाल युवक वर्गातून होत आहे.