Bhoom Municipal Council

भूममध्ये नगरसेवकांचा पुढाकार; स्वखर्चातून सुरू केले कचरा संकलन, प्रशासन मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत

जनशक्ती नगर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी स्वतः पुढाकार घेत आपल्या-आपल्या प्रभागात स्वखर्चाने तीन ट्रॅक्टर लावून कचरा संकलन सुरू केले.

भूममध्ये नगरसेवकांचा पुढाकार; स्वखर्चातून सुरू केले कचरा संकलन, प्रशासन मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत

Bhoom Municipal Council

भूम (Bhoom Municipal Council) : भूम नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनाचे टेंडर संपणे आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत अडकल्याने शहरातील कचरा संकलन पूर्णपणे बंद पडले होते. या परिस्थितीत जनशक्ती नगर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी स्वतः पुढाकार घेत आपल्या-आपल्या प्रभागात स्वखर्चाने तीन ट्रॅक्टर लावून कचरा संकलन सुरू केले. त्यांच्या या उपक्रमाचे शहरभर कौतुक होत आहे.

भूम नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनाचे टेंडर संपल्याने, तसेच विधानपरिषदेची निवडणूक जाहीर होऊन आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे सर्वसाधारण सभा घेता आली नाही. परिणामी शहरातील घंटागाड्या आणि नाली सफाईचे काम पूर्णपणे ठप्प झाले.

या पार्श्वभूमीवर जनशक्ती नगर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देत तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी मजूर नेमून स्वच्छता व्यवस्था सुरू ठेवण्याची मागणी केली होती. मात्र, नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन मागितले असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. त्यानंतरही कोणताही ठोस निर्णय झाला नाही.

अखेर नगरसेवकांनी स्वतः पुढाकार घेत आपल्या-आपल्या प्रभागात स्वखर्चाने तीन ट्रॅक्टरच्या माध्यमातून कचरा संकलन सुरू केले. लक्ष्मी नगर, गालिब नगर, निखिल नगर, एस. पी. कॉलेज परिसर, वडार गल्ली, भीमनगर, साठेनगर, बागवान गल्ली, कोष्टी गल्ली, समर्थनगर, शिवाजीनगर, शाळू गल्ली, गराडा गल्ली, वीर गल्ली, विजयनगर आणि गांधी चौक या भागांमध्ये ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या उपक्रमामुळे नागरिकांना होणारा त्रास मोठ्या प्रमाणात कमी झाला असून, विशेषतः महिला वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रभागात नियमितपणे ट्रॅक्टर फिरत असल्याने स्वच्छतेची व्यवस्था सुधारल्याचे नागरिकांनी सांगितले. नगरसेवकांनी स्वखर्चाने सुरू केलेल्या या स्वच्छता मोहिमेचे नागरिकांसह महिला वर्गानेही स्वागत केले आहे.

नगराध्यक्षांनी जबाबदारी झटकली असली तरी "माझा प्रभाग, माझी जबाबदारी" या भूमिकेतून नगरसेवकांनी प्रत्यक्ष काम करून दाखवले, अशी चर्चा शहरातील नागरिकांमध्ये सुरू आहे.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
चारधाम यात्रेने रचला नवा विक्रम; भाविकांची संख्या तब्बल 56.18 लाखांपार

चारधाम यात्रेने रचला नवा विक्रम; भाविकांची संख्या तब्बल 56.18 लाखांपार

Chardham Yatra Record: यंदा केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चारही धामांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल. भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यातील धार्मिक आणि आध्यात्मिक पर्यटन

Oct 07, 2026