शालेय क्रीडा स्पर्धा

भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत क्रीडा स्पर्धा संपन्न

MP Anantrao Deshmukh: खासदार, लाडके लोकनेते अनंतरावजी देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेमध्ये १९ ऑगस्ट २०२६ बुधवारला विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन

भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत क्रीडा स्पर्धा संपन्न

MP Anantrao Deshmukh

 

माजी खासदार अनंतरावजी देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त

रिसोड (MP Anantrao Deshmukh) : दि आर्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच माजी मंत्री व खासदार सर्व सामान्य जनतेचे लाडके लोकनेते, आदरणीय अनंतरावजी देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेमध्ये १९ ऑगस्ट २०२६ बुधवारला विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये वर्ग ५वी ते १२वी मधील विद्यार्थ्यांसाठी धावण्याची शर्यत, स्लो सायकल तसेच विद्यार्थीनींसाठी रांगोळी व संगीत खुर्ची या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये बहुसंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.अत्यंत उत्साहाच्या वातावरणात या सर्व स्पर्धा पार पडल्या. यानंतर प्रत्येक स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळवलेल्या प्रथम तीन विद्यार्थ्यांना मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

शाळेचे प्राचार्य संजय भांडेकर, उपप्राचार्य संजय शर्मा व पर्यवेक्षक ज्ञानेश्वर थोरात तसेच शाळेचे ज्येष्ठ शिक्षक हमाने सर व काटे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे प्राचार्य भांडेकर सर यांनी सन्माननीय अनंतरावजी देशमुख (MP Anantrao Deshmukh) यांना शाळेच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त केल्या व त्यांच्या दीर्घायुष्याबद्दल शुभकामना व्यक्त केल्या तसेच स्पर्धेमध्ये सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यानंतर या वाढदिवसाच्या प्रसंगी वर्ग ५ ते १२ च्या सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  शाळेचे सर्व प्राध्यापक,प्राध्यापिका, शिक्षक,शिक्षिका व सर्व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी परिश्रम घेतले.

संबंधित सामग्री

दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा शुल्क माफ

दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा शुल्क माफ

महाराष्ट्रातील २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षेसाठी शुल्क माफी देण्यात आली आहे.

Sep 30, 2026
कनिष्ठ महाविद्यालयीन संचमान्यतेच्या अडचणींवर सहविचार सभा; तांत्रिक त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करण्याचे आश्वासन

कनिष्ठ महाविद्यालयीन संचमान्यतेच्या अडचणींवर सहविचार सभा; तांत्रिक त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करण्याचे आश्वासन

कनिष्ठ महाविद्यालयीन संचमान्यतेच्या अडचणींवर महासंघाची बैठक झाली. UDISE+ मधील तांत्रिक त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करण्याचे आश्वासन मिळाले.

Sep 29, 2026
दहावीनंतर पॉलिटेक्निकचा मार्ग; CET-JEE च्या स्पर्धेऐवजी विद्यार्थ्यांची पदविकेला पसंती

दहावीनंतर पॉलिटेक्निकचा मार्ग; CET-JEE च्या स्पर्धेऐवजी विद्यार्थ्यांची पदविकेला पसंती

Polytechnic Engineering Admission: दहावीनंतर बारावी आणि अभियांत्रिकी पदवीला प्रवेश घेण्याऐवजी पॉलिटेक्निकमधून पदविका करून अभियांत्रिकीच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल

Sep 29, 2026
शिक्षक नियुक्तीवरून मिसाळवाडीत वाद चिघळला; शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप

शिक्षक नियुक्तीवरून मिसाळवाडीत वाद चिघळला; शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप

मिसाळवाडी शाळेतील शिक्षक नियुक्तीवरून वाद चिघळला. ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले असून, प्रशासनाने निर्णय न बदलल्यास मंगळवारी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Sep 19, 2026
SET परीक्षा पुन्हा लांबणीवर; आता २५ ऑक्टोबरला परीक्षा, तिसऱ्यांदा वेळापत्रकात बदल

SET परीक्षा पुन्हा लांबणीवर; आता २५ ऑक्टोबरला परीक्षा, तिसऱ्यांदा वेळापत्रकात बदल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ४१ वी SET परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता परीक्षा २५ ऑक्टोबरला होणार असून वेळापत्रकात तिसऱ्यांदा बदल झाला आहे.

Sep 15, 2026