Banjara Community

बंजारा समाजाचा एसटी आरक्षणासाठी पोहरादेवी येथे बेमुदत उपोषण!

पोहरादेवी येथे बंजारा समाजाचे एसटी आरक्षणासाठी बेमुदत उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू; समितीचा प्रगती अहवाल जाहीर करण्यासह विविध मागण्या.

बंजारा समाजाचा एसटी आरक्षणासाठी पोहरादेवी येथे बेमुदत उपोषण!

Banjara Community

तिसऱ्याही दिवशी आंदोलन सुरूच; समितीच्या प्रगती अहवालावर प्रश्नचिन्ह?

मानोरा : बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करून संवैधानिक आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सकल बंजारा समाजाच्या वतीने पोहरादेवी येथे १३ सप्टेंबरपासून ९ बंजारा बांधवांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मंगळवारी उपोषणाचा तिसरा दिवस असून आंदोलन सुरूच होते.

बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीचा अभ्यास करण्यासाठी शासनाने २७ फेब्रुवारी २०२६ रोजी समिती स्थापन केली होती. मात्र, समितीने आतापर्यंत केलेला अभ्यास, घेतलेल्या बैठका तसेच अहवालाची सद्य:स्थिती याबाबत समाजाला स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही, असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे समितीने केलेल्या कामाचा सविस्तर प्रगती अहवाल तातडीने सार्वजनिक करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

एसटी आरक्षणाचा अंतिम निर्णय होईपर्यंत बंजारा समाजाला एसटी प्रवर्गाच्या धर्तीवर शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक सवलती द्याव्यात, समितीचा अहवाल तातडीने पूर्ण करून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा, तसेच तेलंगणा व आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एसटी आरक्षण द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

या मागणीसाठी संजय महाराज (पोहरादेवी), सतीश पवार (बीड), श्रीकांत राठोड (जालना), अंकुश राठोड (बुलढाणा), दिनकर राठोड (पुसद), सुरेश राठोड (हिंगोली), रमेश ऊर्फ सोम पवार (उमरी खुर्द), नामदेव राठोड (औंढा नागनाथ) आणि जयसिंग राठोड (आर्णी) यांचा या उपोषणात समावेश आहे.

बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे हे आंदोलन सुरू झाल्याने या मागणीला पुन्हा एकदा जोर धरला आहे. समितीचा प्रगती अहवाल कधी जाहीर होणार आणि एसटी आरक्षणाबाबत शासनाची पुढील भूमिका काय असेल, याकडे संपूर्ण भारत देशातील बंजारा समाजाचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026