बल्लारपुर वाहतूक ठप्प

बल्लारपूरमध्ये मुख्य मार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

Ballarpur Traffic Jam: बल्लारपूर शहरातील नगरपालिका चौक परिसरात राजुरा–चंद्रपूर मुख्य मार्गावर एक मोठे झाड अचानक कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. झाड रस्त्यावर आडवे पडल्यामुळे..

बल्लारपूरमध्ये मुख्य मार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

Ballarpur Traffic Jam

बल्लारपूर (Ballarpur Traffic Jam) : बल्लारपूर शहरातील नगरपालिका चौक परिसरात राजुरा–चंद्रपूर मुख्य मार्गावर एक मोठे झाड अचानक कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. झाड रस्त्यावर आडवे पडल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

घटनेची माहिती मिळताच प्रशासन व संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. झाड हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, काही वेळातच मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

दरम्यान, बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयाच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे काम सुरू असल्याने झाडाची मुळे कमकुवत झाली असावीत, त्यामुळेच हे झाड कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या (Ballarpur Traffic Jam) घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाले नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

मानोऱ्यात वैद्यकीय विद्यार्थ्याला बोलेरो पिकअपची धडक; तक्रार आणि CCTV पुरावा असूनही वाहन ताब्यात न घेतल्याचा आरोप.

Oct 03, 2026
पुण्यात स्कूल बसची दुचाकीला धडक; बहिणीच्या डोळ्यांसमोर १६ वर्षीय भावाचा मृत्यू

पुण्यात स्कूल बसची दुचाकीला धडक; बहिणीच्या डोळ्यांसमोर १६ वर्षीय भावाचा मृत्यू

पुण्यात स्कूल बसच्या धडकेत १६ वर्षीय रोहित कुदळेचा मृत्यू झाला. बहिण रिया गंभीर जखमी असून बसचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला.

Oct 01, 2026
अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

Maharashtra Road Accident: राज्य रस्ते सुरक्षा परिषद बैठक, या तीन वर्षांच्या कालावधीत राज्यात 1.17 लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले असून, त्यात 50 हजार 488 जणांचा मृत्यू झाला आहे.

Sep 28, 2026
पुण्यात भरधाव डंपरची दुचाकीला धडक; २० वर्षीय IT इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू

पुण्यात भरधाव डंपरची दुचाकीला धडक; २० वर्षीय IT इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू

महंमदवाडीत भरधाव डंपरच्या धडकेत २० वर्षीय IT इंजिनिअर हमजा इब्राहिम सरकारचा मृत्यू झाला. एक तरुण गंभीर जखमी असून डंपर चालकाला अटक करण्यात आली.

Sep 23, 2026