Ausa Rural Hospital

औसा ग्रामीण रुग्णालयाची 'सक्सेस स्टोरी'! गुंतागुंतीची जुळ्या गर्भधारणेची नॉर्मल प्रसूती यशस्वी

मर्यादित सुविधा असतानाही उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देत औसा येथील ग्रामीण रुग्णालयाने पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.

औसा ग्रामीण रुग्णालयाची 'सक्सेस स्टोरी'! गुंतागुंतीची जुळ्या गर्भधारणेची नॉर्मल प्रसूती यशस्वी

Ausa Rural Hospital

आईसह दोन्ही बाळांची प्रकृती उत्तम

मर्यादित सुविधा असतानाही उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देत औसा येथील ग्रामीण रुग्णालयाने पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या जुळ्या गर्भधारणेची प्रसूती शस्त्रक्रिया न करता सामान्य पद्धतीने यशस्वी करण्यात वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकांच्या पथकाला यश आले. आईसह दोन्ही नवजात बाळांची प्रकृती उत्तम असून या कामगिरीबद्दल ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तस्लिम माजीद शेख (वय 27) या महिलेला गुरुवारी (दि. 6 ऑगस्ट) दुपारी 12.10 वाजता प्रसूतीसाठी औसा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणीदरम्यान संबंधित महिला जुळ्या गर्भाची आई असल्याचे तसेच प्रसूती अत्यंत गुंतागुंतीची असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णाच्या नातेवाईकांना संपूर्ण माहिती देण्यात आली. त्यांची संमती घेतल्यानंतर रुग्णालयातील अनुभवी वैद्यकीय पथकाने सामान्य प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर व अधिपरिचारिकांनी समन्वय, संयम आणि कौशल्याच्या बळावर ही आव्हानात्मक प्रसूती यशस्वीरित्या पूर्ण केली. प्रसूतीनंतर दोन गोंडस मुलांचा जन्म झाला.

रुग्णालयातील एनसीडी विभागाचे श्री. अतुल कांबळे यांनी या यशस्वी कार्याची माहिती देत संपूर्ण वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. मर्यादित साधनसामग्रीतही अशा प्रकारची गुंतागुंतीची प्रसूती यशस्वीरीत्या पार पडल्याने औसा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय सेवेला नवी ओळख मिळाली असून परिसरातून डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आईसह दोन्ही बाळांची प्रकृती उत्तम

दोन्ही नवजात अर्भकांचे वजन प्रत्येकी दोन किलो असून आई आणि दोन्ही बाळांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. तिघांच्याही जीविताला कोणताही धोका नसल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

या यशस्वी प्रसूतीसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. प्रभारी परिसेविका श्रीमती अर्चना सगर, श्रीमती चांदणी मोरे, श्रीमती हमीदा राठोडे यांच्यासह कर्तव्यावरील डॉ. सायली कापसे, अधिपरिचारिका श्रीमती कावेरी भोसले आणि श्रीमती योगेश्वरी जाधव यांनी अथक परिश्रम घेत ही गुंतागुंतीची प्रसूती सामान्य पद्धतीने यशस्वी केली.

 

संबंधित सामग्री

गडचिरोलीत १७ दिवसांत तिसरा माता-बाल मृत्यू; आरोग्य यंत्रणेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

गडचिरोलीत १७ दिवसांत तिसरा माता-बाल मृत्यू; आरोग्य यंत्रणेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

गडचिरोलीत अवघ्या १७ दिवसांत तिसरा माता-बाल मृत्यू झाला आहे. धानोरा तालुक्यातील दिव्या रामसिंग उईके यांचा प्रसूतीदरम्यान बाळासह मृत्यू झाला.

Sep 09, 2026
मुंबईत मलेरियाचा वाढता धोका; ४ वर्षांत रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढले

मुंबईत मलेरियाचा वाढता धोका; ४ वर्षांत रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढले

​​​​​​​मुंबईतील मलेरियाचे संकट कमी होण्याऐवजी पुन्हा वाढताना दिसत आहे.

Sep 05, 2026
खासगी रुग्णालयांच्या शुल्कावर नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करा

खासगी रुग्णालयांच्या शुल्कावर नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करा

गोरगरीब, वंचित तसेच सर्वसामान्य नागरिकांना उपचाराचा लाभ मिळावा, यासाठी शासनाकडून विविध आरोग्यविषयक योजना राबविण्यात येत आहेत.

Aug 28, 2026
माऊलीच्या गर्भातील स्पंदनं अन् आसरा देणारी झोळीही शांत झाली

माऊलीच्या गर्भातील स्पंदनं अन् आसरा देणारी झोळीही शांत झाली

ज्या देशात आज तंत्रज्ञान आणि विकासाच्या गप्पा मारल्या जातात, त्याच देशातील एका कोपऱ्यात एका गर्भवतीच्या आक्रोशाने नात्यांची अन् संवेदनशीलतेची लक्तरे वेशीवर टांगली आहेत.

Aug 27, 2026
H1N1 स्वाइन फ्लूची ही लक्षणं दिसतायत? डोळ्यांकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या कोणती लक्षणं धोक्याची

H1N1 स्वाइन फ्लूची ही लक्षणं दिसतायत? डोळ्यांकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या कोणती लक्षणं धोक्याची

स्वाइन फ्लू अर्थात H1N1 संसर्ग म्हटलं की ताप, खोकला, सर्दी, घशात खवखव आणि अंगदुखी ही लक्षणं प्रामुख्याने समोर येतात.

Aug 26, 2026