Snake Bite

माऊलीच्या गर्भातील स्पंदनं अन् आसरा देणारी झोळीही शांत झाली

ज्या देशात आज तंत्रज्ञान आणि विकासाच्या गप्पा मारल्या जातात, त्याच देशातील एका कोपऱ्यात एका गर्भवतीच्या आक्रोशाने नात्यांची अन् संवेदनशीलतेची लक्तरे वेशीवर टांगली आहेत.

माऊलीच्या गर्भातील स्पंदनं अन् आसरा देणारी झोळीही शांत झाली

सादुरीच्या ‘त्या’ अखेरच्या प्रवासाने जिल्हा सुन्न!

बुलढाणा : ज्या देशात आज तंत्रज्ञान आणि विकासाच्या गप्पा मारल्या जातात, त्याच देशातील एका कोपऱ्यात एका गर्भवतीच्या आक्रोशाने नात्यांची अन् संवेदनशीलतेची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. जळगाव जामोद तालुक्यातील चाळीस टपरी या आदिवासी पाड्यातील २२ वर्षीय सादुरी राधेश्याम खरात हिच्या पोटात एका चिमुकल्या जिवाचे स्वप्न फुलत असतानाच तिला सापाने गाठले. मात्र, सापाच्या विषापेक्षाही जास्त विषारी ठरली ती प्रशासनाची अनास्था आणि रस्त्याचा पत्ताच नसलेली ही विषण्ण व्यवस्था!

२५ ऑगस्टच्या त्या दुर्दैवी दिवशी सादुरी सर्पदंशाने तडफडत होती. गावात पक्का रस्ता नसल्याने वाहनाचा विचारही दूरचा होता. अखेर गावकऱ्यांनी बांबू आणि चादरीची एक झोळी तयार केली. पोटात वेदना अन् अंगात भिनणारे विष सावरत, चिखलमय वाटेतून सादुरीला झोळीत घालून भिंगारा आणि तिथून जळगाव जामोद प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. माऊलीच्या डोळ्यांत एकच आस होती—‘माझ्या लेकराला नि मला वाचवा!’

आरोग्य केंद्रात पोहोचल्यानंतर समजले की, तिथे सर्पदंशावर योग्य उपचार उपलब्ध नाहीत. त्यानंतर सादुरीला खामगावला नेण्याचा सल्ला देण्यात आला. खामगावच्या उपजिल्हा रुग्णालयात पोहोचल्यानंतरही सादुरीची खालावत चाललेली प्रकृती पाहून डॉक्टरांनी ‘अकोल्याला घेऊन जा’, असे सांगितले.

एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात सुरू असलेल्या या धावपळीत उपचारांअभावी वेळ निघून जात होती. अखेर अकोल्याच्या वाटेवरच सादुरीने आणि तिच्या पोटातील अनाम जिवाने या निष्ठुर जगाचा शेवटचा निरोप घेतला.

राजकारण्यांच्या घोषणांच्या आणि प्रशासनाच्या कागदी कारभाराच्या चिखलात सादुरीचा निष्पाप बळी गेला आहे. एका माऊलीची झोळीत झालेली ही मृत्यूची डोली आज प्रत्येक संवेदनशील माणसाच्या मनाला सुन्न करून जात आहे. या मृत्यूनंतर तरी ढिम्म प्रशासन जागे होणार, की आणखी कोणा गर्भवतीची झोळीच तिची तिरडी ठरणार?

८० वर्षांनंतरही स्वातंत्र्यापासून वंचित ‘चाळीस टपरी’!

देश स्वातंत्र्याचा अमृतकाळ साजरा करत असताना, चाळीस टपरीसारख्या गावांसाठी आजही पक्का रस्ता एक स्वप्नच आहे. दर पावसाळ्यात या पाड्याचा बाह्य जगाशी संपर्क तुटतो. मूलभूत आरोग्य सुविधा, ऑक्सिजन, अतिदक्षता विभाग तर लांबची गोष्ट; येथे वेळेवर एक इंजेक्शनही मिळत नाही. ‘आमचं मरण एवढं स्वस्त का?’ असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026