अंजनवाडी मृतदेह

अंजनवाडी शिवारात कॅनॉल मध्ये आढळला मृतदेह 

Anganwadi Dead Body: अंजनवाडी शिवारातील कॅनलमध्ये ३२ वर्षीय राहुल चव्हाण यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व तपास सुरु केला आहे.

अंजनवाडी शिवारात कॅनॉल मध्ये आढळला मृतदेह 

Anganwadi Dead Body

औंढा नागनाथ (Anganwadi Dead Body) : तालुक्यातील अंजनवाडी शिवारातून वाहणार्‍या कॅनलमध्ये ३२ वर्षीय व्यक्तीचा दिनांक २७ एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजे दरम्यान मृतदेह आढळून आला आहे माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलीस घटनास्थळी दाखल झाले व यानंतर पंचनामा करण्यात आला आहे.

राहुल गोपीनाथ चव्हाण (३२) रा. लोहरा खुर्द असे मृतदेह आढळून आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. राहुल चव्हाण हे मिसिंग असल्या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिसांना दिनांक २६ एप्रिल रोजी मिसिंग दाखल आहे यानंतर शोध घेतला असता २६ एप्रिल रोजी गोळेगाव जवळ कॅनॉल लगत सदरील व्यक्तीची दुचाकी व चप्पल आढळून आली यानंतर २७ एप्रिल रोजी सदरील व्यक्तीचा अंजनवाडी जवळ कॅनल मध्ये तरंगताना मृतदेह आढळला माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत, पोलीस उपनिरीक्षक दत्ता कानगुले, जमादार इमरानोद्दीन सिद्दिकी, जमादार वसीम पठाण, अंबादास बेले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह (Anganwadi Dead Body) औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आला होता यानंतर मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. घटनेप्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात अद्याप नोंद झाली नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत ४.५ आणि ३.३ तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के; वारंवारच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

Oct 03, 2026
औंढा नागनाथ मंदिर भाविकांसाठी एक महिना बंद 

औंढा नागनाथ मंदिर भाविकांसाठी एक महिना बंद 

Aundha Nagnath Temple closed: औंढा नागनाथ येथील श्री नागनाथ मंदिराच्या परिसरातील आतील गर्भगृहातील दुरुस्तीचे काम सहायक संचालक, पुरातत्व विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Oct 02, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026
ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

ब्राह्मणवाडा येथील ५९ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी तानाजी मोरे यांनी नापिकीच्या चिंतेत विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Sep 29, 2026