AI Fake Photos

AI तंत्रज्ञानातून बनावट फोटो व्हायरल; 'ती माझ्या दिवंगत मित्राची मुलगी', गिरीश महाजनांचा खुलासा, हायकोर्टात जाणार

राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नावाशी संबंधित सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आक्षेपार्ह फोटो प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.

AI तंत्रज्ञानातून बनावट फोटो व्हायरल; 'ती माझ्या दिवंगत मित्राची मुलगी', गिरीश महाजनांचा खुलासा, हायकोर्टात जाणार

AI Fake Photos

सायबर विभागाने फोटो बनावट असल्याचे स्पष्ट; बदनामी करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा

(AI Fake Photos) राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नावाशी संबंधित सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आक्षेपार्ह फोटो प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. महाराष्ट्र राज्य सायबर विभागाने यापूर्वीच हे फोटो मूळ नसून आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेले बनावट फोटो असल्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण प्रकरणावर सविस्तर भूमिका मांडली. संबंधित तरुणी ही आपल्या दिवंगत मित्राची मुलगी असून तिच्या लग्नाची जबाबदारी आपण स्वीकारली असल्याचे सांगत त्यांनी या प्रकारामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला.

पत्रकार परिषदेत गिरीश महाजन यांनी आपल्या कुटुंबातील मूळ छायाचित्रे प्रसारमाध्यमांसमोर सादर केली. यावेळी ते म्हणाले की, "माझ्याशी संबंधित काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित केले जात आहेत. त्या संदर्भात आज मी वस्तुस्थिती स्पष्ट करत आहे. संबंधित मुलगी ही माझ्या दिवंगत मित्राची मुलगी आहे. आमच्या दोन्ही कुटुंबांमध्ये जुने कौटुंबिक संबंध आहेत. गणपतीसह विविध कौटुंबिक कार्यक्रमांतील आणि त्यांच्या कुटुंबासोबतचे अनेक फोटो माझ्याकडे आहेत. ते मुंबईत आल्यावर माझ्या मुलीसोबतही त्यांचे फोटो काढले गेले आहेत."

महाजन यांनी पुढे सांगितले की, सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेले अनेक फोटो हे मूळ स्वरूपात नसून त्यामध्ये छेडछाड करण्यात आली आहे. काही सेल्फी फोटो क्रॉप करण्यात आले आहेत, तर काही छायाचित्रांमधून त्यांच्या पत्नी आणि मुलींना काढून टाकण्यात आले आहे. AI चा वापर करून तयार करण्यात आलेल्या या बनावट फोटोमुळे संबंधित व्यक्तींच्या आयुष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. राजकारणात संघर्ष करायला आपण तयार आहोत, मात्र एखाद्या कुटुंबाला लक्ष्य करून अशा प्रकारे बदनामी करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्रकरणी आपण सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली असून त्याबाबतचे प्रमाणपत्रही प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी संबंधित तरुणीबाबतही स्पष्ट भूमिका मांडली. "त्या मुलीचे लग्न ठरवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. अशा प्रकारे फोटो व्हायरल केल्यामुळे तिच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. मी या संदर्भात सायबर विभाग आणि पोलिसांकडे तक्रार केली आहे. तसेच मुख्यमंत्री यांनाही संपूर्ण माहिती दिली आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून दोषींवर निश्चित कारवाई होईल, असा मला विश्वास आहे. या प्रकरणामागे नेमके कोण आहे, याची माहिती अद्याप नाही. मात्र, या विषयावर राजकारण केले जात आहे," असे महाजन म्हणाले.

या घडामोडींमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्या अधिकृत 'एक्स' (ट्विटर) हँडलवर संबंधित फोटो रिपोस्ट करत त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांच्या पोस्टनंतर हे प्रकरण अधिकच चर्चेत आले आणि राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावरही या विषयाची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली.

आपली तसेच एका कुटुंबाची सामाजिक बदनामी करणाऱ्यांना कायदेशीर मार्गाने उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. या प्रकरणी आपण थेट उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगत, फोटो व्हायरल करणाऱ्यांची यादी आपल्याकडे तयार असल्याचा दावा त्यांनी केला. पत्रकार परिषदेत त्यांनी संबंधित तरुणीसह संपूर्ण कुटुंब एकत्र असलेली मूळ कौटुंबिक छायाचित्रेही प्रसारमाध्यमांना दाखवली.

संबंधित सामग्री

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडखोरी; अजित पवारांच्या नावावरून सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात शाब्दिक संघर्ष.

Oct 04, 2026
‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; SIR, १३ कोटी मतदार आणि ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवर गंभीर सवाल.

Oct 04, 2026
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत गर्जना मोर्चा; राज ठाकरेंनी SIR रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली.

Oct 04, 2026