ओल्ड पोलीस लाइन्सजवळ स्फोट; स्फोटकांनी भरलेले वाहन गेटवर आदळल्याचा प्राथमिक दावा, परिसरात शोधमोहीम सुरू
कोहाट : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील कोहाट येथे शुक्रवारी नमाज सुरू असताना ओल्ड पोलीस लाइन्सजवळ झालेल्या भीषण स्फोटाने परिसरात खळबळ उडाली. प्राथमिक वृत्तांनुसार या घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. स्थानिक रुग्णालयात 25 जखमींना दाखल करण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. मृतांचा आकडा अद्याप विविध अहवालांमध्ये बदलताना दिसत असून परिस्थितीचा तपास सुरू आहे.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, स्फोटकांनी भरलेले एक वाहन ओल्ड पोलीस लाइन्सच्या गेटवर आदळल्यानंतर स्फोट झाला. स्फोटानंतर गोळीबाराचे आवाजही ऐकू आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर स्फोटाची नेमकी प्रकृती आणि कारण निश्चित करण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.
🚨 #Pakistan: An explosion near a Police Lines mosque during Friday prayers has reportedly injured more than 20 people, with several said to be in critical condition. Rescue teams are on site, and the injured are being shifted to hospitals.#Pakistan #Explosion #FridayPrayers… pic.twitter.com/oAGFE1B0WY
— Gulistan News (@GulistanNewsTV) September 18, 2026
मशिदीच्या परिसराचे नुकसान
स्फोटाची तीव्रता मोठी असल्याने मशिदीच्या बाहेरील भागाचे नुकसान झाले असून परिसरात मोठा खड्डा निर्माण झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एका भिंतीचेही नुकसान झाले असून आसपासच्या इमारतींवरही स्फोटाचा परिणाम झाल्याची माहिती आहे.
घटनेनंतर Rescue 1122 च्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना प्राथमिक उपचार देऊन रुग्णवाहिकांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. कोहाटच्या DHQ रुग्णालयात आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली होती. जखमींमध्ये पोलीस कर्मचारीही असल्याची माहिती समोर आली आहे.
🚨 Kohat, Khyber Pakhtunkhwa, Pakistan:
— 𝐆𝐞𝐨 𝐆𝐫𝐢𝐝 (@GeoGrid_) September 18, 2026
Powerful explosion inside Jamia Mosque at Kohat Police Lines during Friday prayers. Reports say 20 killed and 50+ injured though the exact casualties are yet to be confirmed pic.twitter.com/VO7TdwyA2m
सुरक्षा दलांकडून परिसराला घेराव
स्फोटानंतर पोलिस आणि सुरक्षा दलांनी ओल्ड पोलीस लाइन्स परिसराला वेढा घातला. परिसरात सर्च आणि क्लीअरन्स ऑपरेशन सुरू करण्यात आले असून अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. कोहाट-हंगू रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Suicide bomber targeted a mosque in Kohat District, Pakistan, while worshippers were offering Friday prayers. pic.twitter.com/OMPpWrIjse
— Umar Farooq Mohmand (@UmarFarooq92514) September 18, 2026
स्फोटाचा तपास सुरू
अधिकारी स्फोट नेमका कशामुळे झाला, त्यामागील परिस्थिती काय होती आणि यामध्ये कोणाचा सहभाग आहे, याचा तपास करत आहेत. स्फोटानंतर गोळीबाराचे आवाज ऐकू आल्याच्या वृत्ताचीही पडताळणी केली जात आहे. या घटनेबाबत अधिकृत तपास पुढे जात असताना मृतांचा नेमका आकडा आणि स्फोटाची पूर्ण माहिती स्पष्ट होण्याची प्रतीक्षा आहे.