नवी दिल्ली (Oxygen cylinder explosion) : ओखला फेज-1 येथील गोदामात ऑक्सिजन सिलिंडर उतरवताना बुधवारी सकाळी झालेल्या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. गाझियाबादहून ट्रकमधून आणलेले सिलिंडर उतरविताना हा स्फोट झाला. मोहित सिंग याचा जागीच मृत्यू झाला. जयपूरचा रहिवासी मोहित गेल्या तीन वर्षांपासून संबंधित कंपनीत काम करीत होता.
उमेश, अरविंद, मनोज आणि पंकज हे चार कामगार जखमी झाले असून त्यांना एम्सच्या आघात उपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात हे गोदाम ‘एसएम ट्रेडर्स’ या औद्योगिक ऑक्सिजन सिलिंडर विक्री व वितरण करणाऱ्या कंपनीचे असल्याचे स्पष्ट झाले. येथे ऑक्सिजन भरण्याचे संयंत्र आढळले नाही. पुरवठादार राम अवतार याच्यामार्फत गाझियाबादहून भरलेले सिलिंडर आणण्यात आले होते. ते ओखला परिसरातील व्यावसायिक व औद्योगिक आस्थापनांना वितरित केले जात होते. (Oxygen cylinder explosion) स्फोटाचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू असून, संबंधित कागदपत्रांचीही तपासणी केली जात आहे.
ऑक्सिजन सिलिंडरच्या स्फोट
ऑक्सिजन सिलिंडरच्या स्फोटात एकाचा मृत्यू
Oxygen cylinder explosion: ओखला फेज-1 येथील गोदामात ऑक्सिजन सिलिंडर उतरवताना बुधवारी सकाळी झालेल्या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले.
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Oxygen cylinder explosion
टैग्स:
Oxygen cylinder explosion