बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पावरील हल्ला: मध्य-पूर्वेतील सुरू असलेल्या युद्धाने आता एक अत्यंत धोकादायक वळण घेतले आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त लष्करी दलांनी शनिवारी इराणच्या महत्त्वाच्या बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पाजवळील भागांना लक्ष्य केले. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (IAEA) या हल्ल्यात क्षेपणास्त्राच्या तुकड्यांमुळे एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.
अणुऊर्जा प्रकल्पात किती धोका असतो?
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी दावा केला आहे की, २८ फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाल्यापासून बुशेहर येथील केंद्रावर चार वेळा बॉम्बहल्ला झाला आहे. तथापि, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (IAEA) दिलासा दिला आहे की, हल्ल्यानंतर परिसरातील किरणोत्सर्गाच्या पातळीत कोणतीही वाढ नोंदवली गेली नाही. केंद्राचे मुख्य भाग सुरक्षित आहेत, परंतु उपकरणे असलेल्या सहायक इमारतीचे नुकसान झाले आहे.
रशियन कर्मचाऱ्यांचे स्थलांतर
हल्ल्यानंतर, रशियाची सरकारी अणुऊर्जा कंपनी रोसाटॉमने अणुऊर्जा प्रकल्पात काम करणाऱ्या १९८ रशियन कर्मचाऱ्यांना बसने तात्काळ इराण-आर्मेनिया सीमेवर हलवले. रोसाटॉमचे प्रमुख अलेक्सी लिकाचेव्ह यांनी सांगितले की, हल्ला झाल्यानंतर अवघ्या २० मिनिटांतच बचावकार्य सुरू करण्यात आले.
Satellite imagery shows damage from US and Israeli strikes on Iran's infrastructure, hitting ports at Bushehr and Qeshm and military sites on Kharg. Bushehr’s port is near Iran’s only operational nuclear plant, which Tehran says was not hit.
— Al Jazeera English (@AJEnglish) April 4, 2026
Al Jazeera's Julide Ayger explains. pic.twitter.com/pdERwOaEHd
पेट्रोकेमिकल केंद्रांवरही क्षेपणास्त्रे डागण्यात आली.
इराणचे ऊर्जा केंद्र मानल्या जाणाऱ्या खुझेस्तान प्रांतातील अणुऊर्जा प्रकल्पावरच नव्हे, तर अनेक पेट्रोकेमिकल प्रकल्पांवरही क्षेपणास्त्र हल्ले झाले आहेत. महशहर पेट्रोकेमिकल विशेष आर्थिक क्षेत्रात प्रचंड स्फोट आणि धुराचे लोट दिसून आले. बंदर इमाम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स आणि फजर १ व २ यांसारख्या कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यांमध्ये सुमारे ५ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.