महसूल क्रीडा स्पर्धा

विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेला शुक्रवार पासून परभणीत प्रारंभ

Revenue sports competition: परभणीत शुक्रवारपासून महसूल विभागाच्या वतीने विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा सुरू होणार आहेत. अधिकारी व कर्मचारी यात सहभागी होत आहेत.

विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेला शुक्रवार पासून परभणीत प्रारंभ

Revenue sports competition

हिंगोली (Revenue sports competition) : दर वर्षी प्रमाणे यंदाही महसूल विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा शुक्रवार पासून परभणी येथे सुरु होणार आहेत. त्यामुळे गुरुवारी हिंगोली जिल्ह्यातील महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी सहभागी होण्यासाठी गुरुवारी दुपारी परभणी कडे रवाना झाले. तत्पूर्वी  जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी महसूल संघाला हिरवी झेंडी दाखवली. महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांना वर्षभर कामकाज करावे लागते, यातून त्यांना अधिक कामे करताना चेतना, ऊर्जा मिळावी यासाठी विभागीय स्तरावरून सांस्कृतिक, क्रीडा स्पर्धाचे आयोजन केले जाते. त्यानुसार यावर्षी ता. 3 ते 4 एप्रिल या कालावधीत परभणी येथे विभागीय स्पर्धेचे आयोजन केले आहे.

यामध्ये अधिकारी, कर्मचारी सांघिक व वयक्तिक स्पर्धेत सहभागी होणार आहेत. दरम्यान, काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी  राहुल गुप्ता , अप्पर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, मंजुषा मुथा, अप्पासाहेब पाटील, चोंढेकर यांच्यासह उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते, माने, समाधान घुटूकडे , तहसीलदार श्रीकांत भुजबळ, शारदा दळवी, जीवक कुमार कांबळे, सखाराम मांडवगडे, नायब तहसीलदार सचिन जोशी, भालेराव  आदिनी विभागीय स्पर्धेत सहभागी कलावंताची निवड चाचणी घेतली. यातील उत्कृष्ठ कलावांताची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.

आता हे खेळाडू, कलावंत विभागीय स्पर्धेत जिल्ह्याला बक्षीस मिळवून देतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. विभागात टॉप वन मध्ये आणला जाईल अशी प्रतिक्रिया काही खेळाडूंनी दिली. दरम्यान, परभणी येथे होणाऱ्या विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत क्रिकेट, महिला टर्फ क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, खोखो, पुरुष, महिला, व्होली्बॉल, या सांघिक खेळासह बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन, लॉन टेनिस, एकेरी, दुहेरी, 100 मिटर, 200 मिटर, 400 मिटर धावणे, थाळी फेक, भाला फेक, गोळा फेक, लांब उडी, उंच उडी आदींचा समावेश आहे.

संबंधित सामग्री

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026