Neeru Dhanda

इतिहास घडला! नीरू ढांडा एशियन गेम्समध्ये वैयक्तिक ट्रॅप गोल्ड जिंकणारी पहिली भारतीय महिला

नीरू ढांडाने एशियन गेम्स 2026 मध्ये महिलांच्या ट्रॅप शूटिंगमध्ये सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला. २८ गुणांसह तिने आशियाई विक्रमही मोडला.

इतिहास घडला! नीरू ढांडा एशियन गेम्समध्ये वैयक्तिक ट्रॅप गोल्ड जिंकणारी पहिली भारतीय महिला

२८ गुणांसह नीरू ढांडा ठरली आशियाई स्पर्धेतील महिलांच्या वैयक्तिक ट्रॅपमध्ये सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला शूटर

एशियन गेम्स 2026 मध्ये भारताच्या पदकतालिकेत आणखी एका सुवर्णपदकाची भर पडली आहे. मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी नेमबाजीमध्ये नीरू ढांडाने महिलांच्या इंडिव्हिज्युअल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. या विजयासह एशियन गेम्समध्ये वैयक्तिक ट्रॅप प्रकारात सुवर्ण जिंकणारी नीरू ही पहिली भारतीय महिला शूटर ठरली. तिच्या कामगिरीमुळे भारताच्या सुवर्णपदकांची संख्या पाचवर पोहोचली आहे.

नीरूने स्पर्धेच्या पात्रता फेरीतच आपली ताकद दाखवून दिली होती. तिने १२५ पैकी ११८ हिट्सची नोंद करत अव्वल स्थान मिळवले आणि आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. तिच्या ११८ गुणांच्या कामगिरीने एशियन गेम्समधील पात्रता फेरीतील विक्रमाची बरोबरी केली.

अंतिम फेरीत नीरूने सातत्यपूर्ण कामगिरी कायम ठेवत २८ गुण मिळवले आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. चीनची सन युनोंग २६ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिली, तर कुवेतच्या हजर अब्दुलमलिकने २१ गुण मिळवत कांस्यपदक पटकावले. नीरूच्या २८ गुणांच्या कामगिरीने यापूर्वीचा २४ गुणांचा आशियाई विक्रमही मागे पडला.

या स्पर्धेत भारताच्या आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांनीही सहभाग घेतला होता. मात्र, दोघींना अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही. आशिमा १६व्या, तर मनीषा २३व्या क्रमांकावर राहिल्या.

नीरूच्या या सुवर्णपदकाआधीही भारताच्या ट्रॅप संघाने चमकदार कामगिरी केली होती. नीरू ढांडा, आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांच्या भारतीय संघाने महिलांच्या ट्रॅप टीम इव्हेंटमध्ये रौप्यपदक मिळवले. भारतीय संघाने एकूण ३२८ गुणांची नोंद केली. चीनने ३४६ गुणांसह सुवर्णपदक, तर कुवेतने ३२५ गुणांसह कांस्यपदक पटकावले.

नीरू ढांडासाठी २०२६ हे वर्ष विशेष ठरले आहे. इटलीतील लोनाटो येथे झालेल्या ISSF शॉटगन वर्ल्डकपमध्ये तिने महिलांच्या ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला होता. वर्ल्डकपमध्ये महिलांच्या ट्रॅप प्रकारात सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती.

एशियन गेम्समधील नीरूच्या सुवर्णकामगिरीमुळे भारतीय महिला नेमबाजीच्या इतिहासात आणखी एक महत्त्वाचे पान जोडले गेले आहे. पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात रणधीर सिंह यांनी १९७८च्या एशियन गेम्समध्ये भारतासाठी ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर रोंजन सोढी यांनी २०१०च्या एशियन गेम्समध्ये डबल ट्रॅप प्रकारात भारताला वैयक्तिक सुवर्णपदक मिळवून दिले होते. आता नीरू ढांडाने महिलांच्या वैयक्तिक ट्रॅप प्रकारात सुवर्ण जिंकत या यादीत आपले नाव नोंदवले आहे.

संबंधित सामग्री

भारताचा ‘सुवर्ण चौकार’; आशियाई क्रीडा स्पर्धेत एकाच दिवसात 4 गोल्ड

भारताचा ‘सुवर्ण चौकार’; आशियाई क्रीडा स्पर्धेत एकाच दिवसात 4 गोल्ड

Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अकराव्या दिवशी भारताने शानदार कामगिरी करत तब्बल चार सुवर्णपदकांची कमाई केली. तिरंदाजीच्या कम्पाऊंड प्रकारात भारताने तीन सुवर्णपदके, नेमबाजीत एक सुवर्णपदक

Sep 30, 2026
चिखलीत जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न

चिखलीत जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न

Rifle Shooting Competition: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा आणि क्रीडा परिषद, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने, हालेलुया नॅशनल..

Sep 28, 2026
मीराबाई चानूने रचला इतिहास! एशियन गेम्समध्ये भारताला रौप्यपदक

मीराबाई चानूने रचला इतिहास! एशियन गेम्समध्ये भारताला रौप्यपदक

Mirabai Chanu Won Silver Medal:  भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने अखेर एशियन गेम्समधील पदकाचे स्वप्न साकार केले. आयची-नागोया एशियन गेम्समध्ये महिलांच्या 49 किलो वजनी गटात मीराबाईने रौप्यपदक

Sep 23, 2026
सुचिका तरियालने रचला इतिहास; भारताला MMAमध्ये पहिले कांस्यपदक

सुचिका तरियालने रचला इतिहास; भारताला MMAमध्ये पहिले कांस्यपदक

सुचिका तरियालने Asian Games 2026 मध्ये MMAच्या 60 किलो गटात कांस्यपदक जिंकत इतिहास रचला. भारताला या क्रीडा प्रकारातील हे पहिले आशियाई क्रीडा पदक आहे.

Sep 21, 2026
एमी विर्कवर प्राणघातक हल्ला; कॅनडामध्ये गायक-अभिनेत्याच्या गाडीवर झाडल्या 7 गोळ्या

एमी विर्कवर प्राणघातक हल्ला; कॅनडामध्ये गायक-अभिनेत्याच्या गाडीवर झाडल्या 7 गोळ्या

Ammy Virk: पंजाबी गायक आणि अभिनेता एमी विर्कवर कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबियामधील ॲबट्सफोर्ड येथे एका कॉन्सर्टनंतर लगेचच प्राणघातक हल्ला झाला.

Sep 09, 2026