भोंदु खरातबाबाची काळा वरात भरचौकात हाना कमरीत लात.

महाराष्ट्रात ढोंगी बाबा अंधश्रद्धेचा फायदा घेत आहेत. समाजातील विविध घटकांच्या आर्थिक आणि भावनिक शोषणामुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

भोंदु खरातबाबाची काळा वरात
भरचौकात हाना कमरीत लात.

लागले राजा! कोनी जमिनीतलं धन काळासाठी, कोनी लेकरु व्हासाठी, कोनी दुश्मनी काळासाठी थं कोनी पयसा डबल करासाठी तं कोनी मौजमस्तीसाठी भोंदुबाबाजोळ शिष्याले पयसा दीवून नंभर लावतात! ईतल्यात हा सह्यांद्रीच्या छातीचा, ताकदबाज म्हाराष्ट भलकसा अशा ढोंगी-भोंदू बेसरम बाबाईनं अंदरुन उखरला! धीप्पाळ उंचीचे, पीळदार मीशीचे, राबबाज दाळीचे वजनदार मान्स हातभर दाळीवाल्या हरामखोर भोंदूबाबाच्या पायाशी लोटांगन घेतात! म्हंजे हे बायकी ढोंगी बाबा देवापरसबी मोठ्ठे झाले? कीती लाजीरवानी गोठ झाली? बरं या जादुटोन्याच्या खोट्या धंद्यात श्रीमंतीचा माज असनारेच फसतात अन् गोरगरीब कष्टकरी मान्सं पोटातल्या भुकीसाठी तळफळतात?
या भोंदुबाबाच्या नांदी लागून, पयसा वाया घालोनार्‍या या मायमाऊल्याईचे मले तं पाया लागून तेईच्यापुळे 'वंदीन चरन पाईन डोयानं रुप तुये' अशी आरोयी ठोकाव वाट्टे!
ज्या म्हाराष्टात छत्रपती शिवबा, जिजाऊआई, बाबासायेब आंबेडकर, रमाई-भीमाई ज्योतिबा-सावित्री, अहिल्याबाई-तारारानी अशे शुरवीर बायामान्सं या मातीत जलमले त्याच मातीत अशा ढोंगी-भोंदु बाबाचं पीक कसं जोमात फुललं?
बापहो, आपला हिम्मतवान म्हाराष्ट म्हंजे ताकदबाज संस्कृतीनं नटेल-थटेल, भरदार अंगवस्त्राचं सौंदर्य, मानसन्मानाचं आपुलकी-मानुसकीचं 'गाठोळं' बाधून कोन्त्याबी संकटावर मात कराची आपली परंपरा हाये! पन या बह्याळबेलन्या, टमरेलछाप चलवाद्या भोंदूबाबाईच्या नांदी लागून मायमावल्याईनं या म्हाराष्टाची मान-ईज्जत शरमीन खाली झुकोली नाई काय?
गळेहो, आपून पानीदार-वजनदार, भरदार-दमदार असे मान्सं असल्यावरबी अशा ढमक्या भोंदुबाबाच्या जायात कशासाठी फसतो? बुळ््यातल्या कष्टकरी मान्सापरसबी शिक्षनानं कीती मोठे असलोतरी सारेच राजोटे, पयसा दाटेल मान्सं म्हजे 'जेवळे शिकेल तेवळे हुकेल' अशी गोठ झाली?
हजारो सालापासून म्हाराष्टातल्या सार्‍याच समाजाले शिवबा-जीजाऊ, तुकोबा-ग्यानोबा, गाळगेबाबा-तुकळोजी अशा ज्ञानगंगेच्या भगिरथाईनं या हलकट जादुटोना, अघोरी ईद्या, अंधश्रद्धेनं पछाळलेल्या ढोंगी-भोंदु बाबाच्या ईरोधात समाज प्रबोधन केलं! डेबुजीनं तं बापा सारी जीनगानी खल्लास केली तरी आपून सुधरलो नाई! अशा संताईच्या ईचाराचं ओझं आपल्याले समजलं नाई अन् या छटाकभर लुच्च्या-लफंग्या, सोंगाळ्या भोंदुबाबाच्या 'नागपुजे'ले, चीचीच्या 'चिचार्‍याले' ईज्ञानयुगात आपून कीती मोठ्ठ केलं! देवधर्म करा पन बापहो ढोंगीबाबाच्या जायात अटकू नोका!
 या ढोंगीबाबाची भक्ती म्हंजे 'दिवसा अगरबत्ती अन् राती जबरदस्ती'! भक्तीन नजरीत भरली का तीचं 'कल्यान' झालंच समजा! अशा हेंबाळ्या कर्मानं आसारामपासून हजारो बाबा जेलात सळून रायले तरी आपल्याले 'अक्कलदाळ' फुटली नाई?
येका ईकळे देश युद्धाच्या दनक्यानं  घायल झाला, बुळातला गरीब म्हागाईनं अचंब्यात पळला! कष्टकरी शेतकरी कर्जमाफीच्या 'चक्रव्युहात' फसला! पन उभा म्हाराष्ट या हरामखोर ढोंंगी खरातबाबाच्या कर्मकांडानं, सरपाची पुजा करुन लैंगिक समाधान करनार्‍या दलींदराच्या नांदी लागला!
या देशात फक्त हातभर दाळी वाळवून, हाती कमंडलु घीवून जनतेले फसोनारे 'ढोंंगीबाबा' करोळो रुपयाचे मालक व्हतात! हजारो येक्कर शेती ईकत घीवून मोठमोठाले आलीशान आश्रम बांधून त्यात राधे-कृष्नाची 'रासलीला' दाखोतात! 
बापहो, खरे संत तुकोबा-ज्ञानोबा, डेबुजी-तुकळोजी हेच व्हवून वैकुंठाले गेले! तुकोबाच्या येका अभंगात म्हटलंच हाये ''नवसे कन्या-पुत्र होती तरी मग का करने लागे पती''? अंधश्रद्धा, बुवाबाजी, जादुटोना हे सारं थोटांग हाये! पुजार्‍याईची, ढोंगी बाबाची 'रोजगार हमी योजना' हाये! सारा च्युवत्याचा 'बजार' भरोला हाये! येकातरी बाबात निसर्गाचे संकटं थांबोयाची ताकद हाये काय?
म्हनूनच माई सरकार मायबापाले ईनंती हाये की खरातसारख्या मस्तायेल सांडाले त्याची वरात काळून भरचौकात त्याच्या ढुंगनावर लाथा हानल्या पायजे! त्याले मरेलोग जेलात ठुन रोज पोलिसाईचा 'बाजीराव' दाखोला पायजे! ताच कुठी हे भोंदुबाबा आपोआप कमी व्हतील! पन राजोटेच बाबा भक्त असल्यानं, बाबाले पयसा पुरवून पदरात आशिर्वाद घेनारे असल्यानं खरातबाबाचं काईच तेळं व्हनार नाई? जेलात त्याले 'व्हीआयपी' येवस्था राहील! या खीशात पयसा ऊतु येल राजोट्याईच्या पायी म्हाराष्टाचा सत्त्यानास झाला!
'चीत पयशात अन् मन बाबात' अशी गोठ झाली?

 अरुण मोडक
मो. नं.: ९८२२५९३९४७  

संबंधित सामग्री

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026