सोनम वांगचूक आंदोलन

सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ संविधान चौकात रास्ता रोको आंदोलन

Sonam Wangchuk Andolan: सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ यवतमाळच्या संविधान चौकात विविध चळवळीतील सामाजिक व विद्यार्थी संघटनांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ संविधान चौकात रास्ता रोको आंदोलन

Sonam Wangchuk Andolan

यवतमाळ (Sonam Wangchuk Andolan) : केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या आंदोलनास हुकुमशाही पद्धतीने दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ यवतमाळच्या संविधान चौकात विविध चळवळीतील सामाजिक व विद्यार्थी संघटनांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

नीट पेपरफुटी विरोधात दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर सीजेपीसह पर्यावरणवादी व शिक्षणतज्ञ सोनम वांगचूक (Sonam Wangchuk Andolan) यांनी २८ जूनपासून आमरण उपोषण सुरू केले होते. २० दिवसांपासूनच्या उपोषणादरम्यान सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावल्यामुळे यांच्याशी सरकारने कुठल्याही प्रकारची चर्चा न करता पोलिसांनी बळजबरीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून सरकार विद्यार्थ्यांच्या आंदोलनास हुकुमशाही पद्धतीने दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ येथील संविधान चौकात विविध चळवळीतील सामाजिक व विद्यार्थी संघटनांच्या वतीने  रोको आंदोलन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट पेपर फुटी प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, या मूळ मागणीसह, सरकारने राम मंदिर चोरी प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशा विविध मागण्यांसाठी एक ते दीड तास रस्ता रोको आंदोलन करून सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांसह सामाजिक चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

संबंधित सामग्री

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाशी संबंधित 13 FIR रद्द

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाशी संबंधित 13 FIR रद्द

NEET प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनाशी संबंधित कॉक्रोच जनता पार्टीच्या 13 एफआयआरवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महत्त्वाचा निर्णय दिला.

Sep 01, 2026
पेलेट गन प्रकरणावर राहुल गांधी आक्रमक; दिल्ली पोलिसांच्या DCP कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन

पेलेट गन प्रकरणावर राहुल गांधी आक्रमक; दिल्ली पोलिसांच्या DCP कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन

जंतर मंतर येथील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पेलेट गनच्या वापराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Aug 21, 2026
संसदेत राहुल गांधींविरोधात NDA खासदारांचे आंदोलन; ‘चर्चेपासून पळू नका’, भाजपचा घणाघात

संसदेत राहुल गांधींविरोधात NDA खासदारांचे आंदोलन; ‘चर्चेपासून पळू नका’, भाजपचा घणाघात

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.

Aug 11, 2026
NEET-UG पेपरफुटी प्रकरणात CBIचा मोठा दावा; NTAच्या तज्ज्ञांनीच प्रश्नपत्रिका लीक केल्याचा आरोप

NEET-UG पेपरफुटी प्रकरणात CBIचा मोठा दावा; NTAच्या तज्ज्ञांनीच प्रश्नपत्रिका लीक केल्याचा आरोप

NEET Paper Leak Case: NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठा दावा केला आहे. NTAच्या तीन तज्ज्ञांनीच प्रश्न लक्षात ठेवून बाहेर पोहोचवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Aug 07, 2026
'कॉलेजपेक्षा क्लास महाग'; 'विद्यार्थी चिडणार नाहीत तर काय?' NEET व शिक्षण व्यवस्थेवर राज ठाकरेंचा प्रहार

'कॉलेजपेक्षा क्लास महाग'; 'विद्यार्थी चिडणार नाहीत तर काय?' NEET व शिक्षण व्यवस्थेवर राज ठाकरेंचा प्रहार

राज ठाकरे यांनी राज्य सरकार आणि कोचिंग क्लासेसच्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका केली आहे.

Aug 07, 2026