Parbhani Municipal Corporation

परभणी मनपा स्वीकृत सदस्यपदासाठी अंबिका डहाळे, विनोद कदम यांचे अर्ज दाखल; पाच जागांसाठी अर्जांची प्रक्रिया पूर्ण

स्वीकृत सदस्यपदासाठी अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी १ अशी निश्चित करण्यात आली होती.

परभणी मनपा स्वीकृत सदस्यपदासाठी अंबिका डहाळे, विनोद कदम यांचे अर्ज दाखल; पाच जागांसाठी अर्जांची प्रक्रिया पूर्ण

Parbhani Municipal Corporation

परभणी (Parbhani Municipal Corporation) : परभणी शहर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी सोमवार (२९ जून) रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून अंबिका डहाळे, तर काँग्रेसकडून विनोद कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. स्वीकृत सदस्यपदासाठी अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी १ अशी निश्चित करण्यात आली होती. विहित मुदतीत दोन्ही उमेदवारांचे अर्ज महापालिका आयुक्तांकडे प्राप्त झाले.

परभणी महानगरपालिकेच्या सभागृहात एकूण ६५ नगरसेवक असून, त्याशिवाय ६ स्वीकृत नगरसेवकांची निवड केली जाते. या जागांपैकी शिवसेना (उबाठा) गटाच्या वाट्याला दोन, तर काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शहर विकास आघाडीच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा आली आहे.

यापूर्वी भाजपकडून शिवाजी भरोसे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून शेख फहाद शालिमार आणि शहर विकास आघाडीकडून राहुल मुरकूटे यांनी अर्ज दाखल केले होते. सोमवारी शिवसेना (उबाठा) गटाकडून अंबिका डहाळे यांनी अर्ज दाखल केला.

यावेळी आमदार डॉ. राहुल पाटील, मनपा गटनेते दिलीप ठाकूर, सभागृहनेते सय्यद समी उर्फ माजू लाला, महानगर प्रमुख डॉ. विवेक नावंदर, विकास राजापुरे, अनिल डहाळे, बाळराजे तळेकर आणि नवनित पाचपोर उपस्थित होते.

काँग्रेसकडून विनोद कदम यांनी महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी काँग्रेसचे गटनेते गुलमीर खान उपस्थित होते.

येत्या सर्वसाधारण सभेत या नावांना मंजुरी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी झालेल्या बैठकीत स्वीकृत नगरसेवकांच्या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब झाले नव्हते.

संबंधित सामग्री

‘महाराष्ट्रात कायद्याचे राज्य की जंगलराज?’- वर्षा गायकवाड

‘महाराष्ट्रात कायद्याचे राज्य की जंगलराज?’- वर्षा गायकवाड

Congress MP Varsha Gaikwad: नाशिकहून शेकडो किलोमीटरची पायपीट करत आपल्या मागण्यांसाठी मुंबईत दाखल झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कारवाईवरून काँग्रेस खासदार प्रा. वर्षा गायकवाड..

Oct 05, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

मराठवाडा पदवीधर मतदार यादीत ‘उद्धव मस्के’ऐवजी उद्धव ठाकरे यांचे नाव आल्याचा दावा. दिलीप घुगे यांनी प्रशासनाकडे तक्रार केली.

Oct 05, 2026
सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडखोरी; अजित पवारांच्या नावावरून सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात शाब्दिक संघर्ष.

Oct 04, 2026
‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; SIR, १३ कोटी मतदार आणि ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवर गंभीर सवाल.

Oct 04, 2026