डॉ. बाबासाहेब आंबेडकर

​डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष, विचार आणि कलात्मकता यांचा संगम

Dr. Babasaheb Ambedkar: नांदेडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित 'संघम शरणम् गच्छामि' महानाट्याचे आयोजन झाले, ज्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

​डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष, विचार आणि कलात्मकता यांचा संगम

Dr. Babasaheb Ambedkar

महानाट्याने नांदेड भारावले..

नांदेड (Dr. Babasaheb Ambedkar) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आणि ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष यांचे औचित्य साधून नांदेड शहरातील सायन्स महाविद्यालयाच्या सभागृहात भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्ष महोत्सव संयोजन समिती, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने 'संघम शरणम् गच्छामि' या हिंदी संगीतमय महानाट्याचे सादरीकरण करण्यात आले. (Dr. Babasaheb Ambedkar) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष, विचार आणि कलात्मकता यांचा संगम: महानाट्याने नांदेडकर भारावले.

​सायंकाळी ८ वाजता कार्यक्रमाचा प्रारंभ अत्यंत उत्साहात झाला. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसचिव मंडळ सदस्य कॉ. विजय गाभणे आणि सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मापकचे जिल्हासचिव काॅ.शंकर सिडाम,काॅ.अदिनाथ इंगोले,काॅ.किशोर पवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

 उपस्थितांशी संवाद साधताना कॉ. विजय गाभणे यांनी या महोत्सवामागची भूमिका आणि चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व सविस्तरपणे विशद केले. त्यानंतर या महानाट्याचा प्रयोग रंगला. महामानवाचा संघर्ष अनुभवण्यासाठी नांदेडकरांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे संपूर्ण सभागृह प्रेक्षकांनी गच्च भरले होते. कलाकारांच्या सादरीकरणाने आणि भारदस्त संवादांनी सभागृह भारावून गेले होते. 'संघम शरणम् गच्छामि'च्या गजरात आणि 'आंबेडकर जिंदाबाद'च्या जयघोषात हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

​हैदराबादच्या २२ कलाकारांचा अविस्मरणीय अभिनय

​हे संगीतमय महानाट्य अभ्युदय आर्ट्स अकादमी, हैदराबाद यांच्या वतीने प्रस्तुत करण्यात आले. हैदराबाद येथील २० कलाकारांनी या नाटकात सहभाग नोंदवला होता. यात पाच मुली आणि १५ मुलांचा सहभाग होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा (Dr. Babasaheb Ambedkar) जन्म, त्यांचा बालपणातील संघर्ष, उच्च शिक्षणासाठी केलेले अपार कष्ट आणि त्यानंतर शोषितांच्या न्यायासाठी दिलेला लढा, असा संपूर्ण जीवनपट या कलाकारांनी आपल्या बहारदार अभिनयातून प्रेक्षकांसमोर जिवंत केला. हिंदी भाषेतील संवाद आणि त्याला लाभलेली संगीताची जोड यामुळे हे महानाट्य अत्यंत प्रभावी ठरले.

आठ राज्यांत ८०४ नाटकांचे सादरीकरण

तेलंगणा राज्यातील खम्मम जिल्ह्यातील कॉम्रेड के. देवेंद्र यांनी २०१६ साली (Dr. Babasaheb Ambedkar) आंबेडकरांवर 'संगम शरणम् गच्छामि' हे नाटक तेलुगू भाषेत लिहिले. त्यानंतर ४५ दिवस या कलाकारांनी नाटकाची तयारी केली. त्यानंतर पहिला प्रयोग तेलंगणा राज्यातील रवींद्र भारती या ठिकाणी केला. त्यावेळी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर या नाटकाचे हिंदी भाषेत रूपांतर करण्यात आले. आजपर्यंत कर्नाटक, मध्य प्रदेश, तमिळनाडू, केरळ, बिहार, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र या आठ राज्यांत ८०४ नाटकांचे प्रयोग सादर करण्यात आले आहेत. यात सर्वाधिक प्रयोग तेलुगू भाषेमध्ये ७५५, हिंदी भाषेत ४५ आणि कर्नाटक मध्ये कन्नड भाषेत ४ प्रयोग करण्यात आले आहेत.

​हे नाटक समाजाला, तरुणांना दिशा देणार

​'संघम शरणम् गच्छामि' हे नाटक समाजाला आणि आजच्या तरुणांना दिशा देणार आणि महामानवाच्या संघर्षाची जाणीव करून देणार असल्यामुळे या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. देशातील सर्वच राज्यांत या नाटकाचे प्रयोग सादर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष आणि त्यांचे विचार घराघरात पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्यावर 'सत्यशोधन' महानाट्य व 'बौद्ध के साथ आंबेडकर की यात्रा' या नाटकाचे देखील आम्ही सादरीकरण करतो.
-​एम. जग्गाराजू, सचिव, अभ्युदय आर्ट्स अकादमी, हैदराबाद

​या नाटकात ५ मुली, १५ मुले असा एकूण २० जणांचा संच होता. त्यापैकीच मेकअप आर्टिस्ट १, ड्रायव्हर २, इलेक्ट्रिशियन २, लायटिंग ऑपरेटर २ असा संच होता. नांदेडमध्ये प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, आयोजकांनी उत्तम नियोजन केले होते.
​-सुरेश मुलगुरे, टीम कॅप्टन

संबंधित सामग्री

तब्बल पंधरा वर्षांनंतर मिळाले आधार कार्ड; तहसीलदारांच्या हस्ते वितरीत 

तब्बल पंधरा वर्षांनंतर मिळाले आधार कार्ड; तहसीलदारांच्या हस्ते वितरीत 

Nanded Aadhar card: गत पंधरा वर्षांपासून आधार कार्ड नसल्याने विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासह दैनंदिन प्रशासकीय कामकाजात अडचणींचा सामना करणाऱ्या संजय डोमाजी दालपे यांना नितीन हातमोडे, सेतू केंद्र..

Oct 07, 2026
नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
नांदेडमध्ये प्रशासन अलर्ट! सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

नांदेडमध्ये प्रशासन अलर्ट! सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

नांदेड जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन २ ते ४ ऑक्टोबरच्या सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Oct 01, 2026
डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

लखमापूर येथे प्रतिबंधित डीजे वापरल्याप्रकरणी माहूर पोलिसांची कारवाई; पाच गणेश मंडळांच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल, १.३७ कोटींचा मुद्देमाल जप्त.

Sep 26, 2026
दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांची सुनेत्रा पवारांसमोर व्यथा; कर्जमाफी आणि मदतीचे आश्वासन

दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांची सुनेत्रा पवारांसमोर व्यथा; कर्जमाफी आणि मदतीचे आश्वासन

नांदेडच्या सोनखेडमध्ये दुष्काळी पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या. सुनेत्रा पवार यांनी पंचनामे, मदत, पाणी, चारा आणि कर्जमाफीबाबत आश्वासन दिले.

Sep 26, 2026