“टोकाचे पाऊल उचलू नका” अभिजीत दिपकेंचे आवाहन

एक स्वप्न, दोन वर्षांची तयारी अन् दुर्दैवी शेवट; MPSC विद्यार्थ्याचा मृत्यू

MPSC Exam: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या २५ वर्षीय प्रथमेश देशमुख या तरुणाचा पुण्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

एक स्वप्न, दोन वर्षांची तयारी अन् दुर्दैवी शेवट; MPSC विद्यार्थ्याचा मृत्यू

MPSC Protest

MPSCची तयारी करणाऱ्या तरुणाचा पुण्यात मृत्यू; अभिजीत दिपकेंचा सरकारवर संताप

परीक्षेतील अनिश्चितता, आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांवर वाढता ताण; “टोकाचे पाऊल उचलू नका” असे आवाहन

पुणे (MPSC Exam) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या २५ वर्षीय प्रथमेश देशमुख या तरुणाचा पुण्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील रहिवासी असलेला प्रथमेश गेल्या दोन वर्षांपासून पुण्यात राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. या घटनेनंतर MPSC परीक्षार्थींच्या प्रश्नांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, प्रथमेश आर्थिक अडचणी आणि कर्जाच्या तणावातून जात होता. पुण्यात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना त्याच्यावर आर्थिक दबाव वाढल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. (MPSC Exam) या प्रकरणाचा पुढील तपास पुणे पोलिसांकडून सुरू आहे. (MPSC Exam) दरम्यान, या घटनेवर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. MPSCच्या परीक्षा प्रक्रियेत वारंवार निर्माण होणारी अनिश्चितता, परीक्षा पुढे ढकलणे, पेपरफुटीचे आरोप आणि भरती प्रक्रियेतील विलंब यामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक व आर्थिक दबाव वाढत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

'विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये'

प्रथमेशच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त करत (Abhijit Dipke) अभिजीत दिपके यांनी MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतेही टोकाचे पाऊल न उचलण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या संघर्षाकडे शासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले. (MPSC Exam) प्रथमेशला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, MPSCच्या परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलनही सुरू आहे. परीक्षा प्रक्रिया पारदर्शक करणे, पेपरफुटीची चौकशी करणे आणि भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासह विविध मागण्या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहेत. प्रथमेशच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर (MPSC Exam) स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील आर्थिक, मानसिक आणि शैक्षणिक दबावाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. MPSCची परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेळेत पार पाडण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026
जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान तीन महिला पत्रकारांनी लैंगिक छळाच्या तक्रारी केल्या. दिल्ली पोलिसांनी प्रकरण क्राइम ब्रांचकडे सोपवले.

Oct 04, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026