MPSC परीक्षा पेपरफुटी

MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण; ६ जणांना अटक

MPSC Exam Paper Leak: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटी प्रकरणात थेट आयोगाच्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कनेक्शन उघड झाले आहे. मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई

MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण; ६ जणांना अटक

MPSC Exam Paper Leak

सर्व आरोपींना २ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी

मुंबई (MPSC Exam Paper Leak) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटी प्रकरणात थेट आयोगाच्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कनेक्शन उघड झाले आहे. मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई करत एमपीएससीच्या अवर सचिवांसह एकूण ६ जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये दोन सहाय्यक कक्ष अधिकारी आणि एका खाजगी अकॅडमीच्या संचालकाचा समावेश असून, न्यायालयाने सर्व आरोपींना २ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

२२ मार्च २०२६ रोजी झालेल्या या परीक्षेचा पेपर आधीच लीक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर (MPSC Exam Paper Leak) आयोगाने मंगळवारी (२५ ऑगस्ट) ही संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता थेट आयोगाच्याच अधिकाऱ्यांना अटक झाल्याने परीक्षा पद्धतीला आणि एकूणच प्रशासनाला मोठा धक्का बसला आहे.

अटक करण्यात आलेले संशयित:
१) अभिजीत गणपतराव लेंडवे (अवर सचिव, एम.पी.एस.सी.) , २) विश्वेश्वर दत्तात्रय नकाते (सहाय्यक कक्ष अधिकारी, एम.पी.एस.सी.), ३) गोपाळ भट्टु मराठे (सहाय्यक कक्ष अधिकारी, एम.पी.एस.सी.), ४) प्रविण दिलीप पाटील (संचालक, कौटिल्य अकादमी, नंदुरबार), ५) अमृत नामदेव पाटील, ६) लोकेश उर्फ गौरव राजेंद्र पाटील
....................

संबंधित सामग्री

झारखंडमध्ये आंदोलक विद्याथ्यावर पोलिसांकडून लाठीमार; अश्रुधूर आणि पाण्याचा मारा, काही आंदोलक जखमी

झारखंडमध्ये आंदोलक विद्याथ्यावर पोलिसांकडून लाठीमार; अश्रुधूर आणि पाण्याचा मारा, काही आंदोलक जखमी

Jharkhand Paper Leak Case: झारखंडमध्ये भरती परीक्षांमधील कथित गैरप्रकारांविरोधात सोमवारी हजारो विद्यार्थी आणि नोकरीच्या इच्छुकांनी राजधानी रांचीमध्ये जोरदार आंदोलन केले. विविध मागण्या घेऊन आंदोलक..

Aug 10, 2026
पेपर लीक प्रकरणावरून मोदी-राहुल आमनेसामने; राहुल गांधींच्या तीन प्रमुख मागण्यांनी राजकीय संघर्ष तीव्र

पेपर लीक प्रकरणावरून मोदी-राहुल आमनेसामने; राहुल गांधींच्या तीन प्रमुख मागण्यांनी राजकीय संघर्ष तीव्र

देशभरात चर्चेत असलेल्या पेपर लीक प्रकरणावर केंद्र सरकारने मोठा निर्णय जाहीर केल्यानंतर राजकीय वातावरण आणखी तापले आहे.

Jul 23, 2026
NEET पेपरफुटी प्रकरणावर मोदी सरकारची कठोर भूमिका; दोषींना सोडणार नाही, किरेन रिजिजूंचा इशारा

NEET पेपरफुटी प्रकरणावर मोदी सरकारची कठोर भूमिका; दोषींना सोडणार नाही, किरेन रिजिजूंचा इशारा

NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने आंदोलन छेडले असून, या आंदोलनाची दखल केंद्र सरकारने घेतली आहे.

Jul 21, 2026
तरुणांच्या भावना दुखावल्या की आंदोलन उभे राहते - सुधीर मुनगंटीवार

तरुणांच्या भावना दुखावल्या की आंदोलन उभे राहते - सुधीर मुनगंटीवार

सोशल मीडियावरून उदयास आलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'ने (सीजेपी) आता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

Jun 06, 2026
नीट पेपरफुटीच्या मास्टरमाईंडला मोठा दणका! पी.व्ही. कुलकर्णीच्या 4 मजली इमारतीवर बुलडोझर

नीट पेपरफुटीच्या मास्टरमाईंडला मोठा दणका! पी.व्ही. कुलकर्णीच्या 4 मजली इमारतीवर बुलडोझर

पालिका प्रशासनाने दिलेल्या नोटीसची मुदत संपल्यानंतर संबंधित बांधकामाचे पाडकाम सुरू करण्यात आले.

Jun 01, 2026