TET पेपर फुटला

TET परीक्षेचा पेपर फुटला; आजची परीक्षा रद्द, भिवंडीत गुन्हा दाखल, हजारो परीक्षार्थींचा हिरमोड

TET paper leaked: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2026 चा पेपर फुटल्याच्या धक्कादायक प्रकारामुळे आज 28 जून रोजी होणारी परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आली आहे. राज्य परीक्षा परिषद, पुणे

TET परीक्षेचा पेपर फुटला; आजची परीक्षा रद्द, भिवंडीत गुन्हा दाखल, हजारो परीक्षार्थींचा हिरमोड

TET paper leaked

हिंगोली (TET paper leaked) : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2026 चा पेपर फुटल्याच्या धक्कादायक प्रकारामुळे आज 28 जून रोजी होणारी परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आली आहे. राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी परीक्षेची गोपनीयता व पारदर्शकता अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेतला असून, राज्यभरातील हजारो परीक्षार्थींना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
  
जिल्हा परिषद हिंगोलीच्या शिक्षण विभागाने 27 जून रोजी पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून याबाबत माहिती दिली. 27 जून रोजी पहाटे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इसमांकडे TET परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील (TET paper leaked) काही प्रश्न आढळून आले. या गंभीर प्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

हिंगोलीत 12 केंद्रांवर होती परीक्षा  
राज्यभरात 28 जून 2026 रोजी TET 2026 चे आयोजन करण्यात आले होते. हिंगोली जिल्ह्यात यासाठी 12 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक कार्यालय, हिंगोली यांनी 26 जून 2026 रोजी काढलेल्या आदेशानुसार पेपर-1 साठी 9 केंद्रे व पेपर-2 साठी 12 केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

- पेपर 1 वेळ: सकाळी 10:30 ते 13:00 
- पेपर 2 वेळ: दुपारी 14:30 ते 17:00 

यामध्ये गोनदर इंटरनॅशनल स्कूल, अनुसया विद्या मंदिर, आदर्श महाविद्यालय, शांताबाई मुंजाजी दगडे हायस्कूल, सेक्रेड हार्ट इंग्लिश स्कूल, शिवाजी महाविद्यालय, माउंट लिट्रा झी स्कूल, नारायणा ई-टेक्नो यांसारख्या केंद्रांचा समावेश होता. प्रत्येक केंद्रावर 2 पुरुष व 2 महिला पोलीस अंमलदार तैनात करण्याचे आदेश देण्यात आले होते.

नवीन तारीख नंतर जाहीर होणार  
शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. हिंगोली यांनी कळवले आहे की, सखोल चौकशी होण्याच्या दृष्टीने परीक्षा तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे. सदर परीक्षेची पुढील तारीख महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून जसे निर्देश प्राप्त होतील, तसे कळवण्यात येईल. 

परीक्षार्थींमध्ये नाराजी  
ऐनवेळी परीक्षा रद्द (TET paper leaked) झाल्याने जिल्ह्यातील हजारो परीक्षार्थींचे हाल झाले. अनेक विद्यार्थी दुरून परीक्षा केंद्राजवळ पोहोचले होते. महिनोनमहिने केलेली मेहनत वाया गेल्याची भावना परीक्षार्थींनी व्यक्त केली. पेपरफुटीच्या या प्रकारामुळे परीक्षा यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संबंधित सामग्री

टीईटी घोटाळ्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे बोंबा बोंब आंदोलन

टीईटी घोटाळ्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे बोंबा बोंब आंदोलन

TET paper leaked: नीट पाठोपाठ रविवार रोजी होणारा शिक्षक भरती परीक्षेचा टीईटीचा पेपर देखील फुटला असून परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या निषेधार्थ खा. रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनात

Jun 28, 2026
परभणीत आज होणारी शिक्षक पात्रता परिक्षा (TET) रद्द

परभणीत आज होणारी शिक्षक पात्रता परिक्षा (TET) रद्द

TET Paper Leaked: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत रविवार २८ जून रोजी  होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या बाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने  प्रसिध्दी पत्रकाराद्वारे कळवल

Jun 28, 2026
MAHATET 2026 ऑनलाईन अर्जासाठी पुन्हा संधी; मुदतवाढ जाहीर

MAHATET 2026 ऑनलाईन अर्जासाठी पुन्हा संधी; मुदतवाढ जाहीर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२६ संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Apr 18, 2026