आमदार राजू पाटील नवघरे

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत सुरू असलेल्या उपोषणाला आमदार राजू पाटील नवघरे यांची भेट

MLA Raju Patil Navghare: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वसमतचे आमदार राजू पाटील नवघरे

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत सुरू असलेल्या उपोषणाला आमदार राजू पाटील नवघरे यांची भेट

MLA Raju Patil Navghare

 

मनोज जरांगे पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा

वसमत (MLA Raju Patil Navghare) : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वसमतचे आमदार राजू पाटील नवघरे यांनी शुक्रवारी अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी भेट देऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील  मागण्या, आंदोलनाची भूमिका तसेच सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली.

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकीय व सामाजिक पटलावर चर्चेत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून, अंतरवाली सराटी हे आंदोलनाचे प्रमुख केंद्र बनले आहे. संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे यांनी उपोषण सुरू केले असून उपोषणाचा सहावा दिवस होता या पार्श्वभूमीवर आमदार नवघरे (MLA Raju Patil Navghare) यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून मनोज जरांगे पाटील यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांच्या तब्येती संदर्भात विचारपूस करून काळजी प्रकृतीची घेण्याची कळकळीची विनंती केली.

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील भूमिका, समाजाच्या प्रमुख मागण्या तसेच शासनाकडून अपेक्षित असलेल्या निर्णयाबाबत आमदार नवघरे यांच्याशी चर्चा केली. मराठा समाजाच्या भावना, अपेक्षा आणि आरक्षणाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

आमदार राजू पाटील नवघरे (MLA Raju Patil Navghare) यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सभागृहात वेळोवेळी भूमिका मांडलेली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या संदर्भात भूमिका घेणारे आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांची उपोषण सुरू असताना प्रत्यक्ष उपोषण स्थळावर भेट देऊन त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत 

संबंधित सामग्री

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026
आमदार राजू पाटील नवघरे यांचा जनता दरबार 

आमदार राजू पाटील नवघरे यांचा जनता दरबार 

MLA Raju Patil Navghare: वसमत येथे आमदार राजू पाटील नवघरे यांनी जनता दरबाराचे आयोजन केले होते या जनता दरबारात मोठ्या संख्येने महिला, नागरिक ग्रामस्थ समस्या घेऊन आले होते आमदार नवघरे

Sep 28, 2026
मराठा आरक्षणासाठी युवकाचे टोकाचे पाऊल; विजेची तार पकडून संपविली जीवनयात्रा

मराठा आरक्षणासाठी युवकाचे टोकाचे पाऊल; विजेची तार पकडून संपविली जीवनयात्रा

Maratha reservation Suicide Case: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलनाचा प्रवाह सुरू असतानाच वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे एका युवकाने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपविल्याची धक्कादायक घटना

Sep 21, 2026
जरांगेंच्या मागण्यांवर फडणवीसांचे भाष्य; १३ पैकी १२ मागण्या मान्य, एका मागणीसमोर कायदेशीर अडचण

जरांगेंच्या मागण्यांवर फडणवीसांचे भाष्य; १३ पैकी १२ मागण्या मान्य, एका मागणीसमोर कायदेशीर अडचण

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी फडणवीसांनी जरांगेंच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य असल्याचे सांगितले. दुष्काळ, शेतकरी आणि मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावरही त्यांनी भाष्य केले.

Sep 17, 2026
मनोज जरांगे पाटलांचे २० दिवसांचे उपोषण मागे; मराठा आरक्षणासाठी सरकारला ९० दिवसांची मुदत

मनोज जरांगे पाटलांचे २० दिवसांचे उपोषण मागे; मराठा आरक्षणासाठी सरकारला ९० दिवसांची मुदत

मनोज जरांगे पाटील यांनी २० दिवसांचे उपोषण मागे घेत सरकारला मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी ९० दिवसांची मुदत दिली. मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला.

Sep 17, 2026