ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस

निवडणूक आयोगाचा निर्णय; ममता बॅनर्जींच्या पक्षाला नवे नाव, ‘फुटबॉल प्लेअर’ चिन्ह

Mamata Banerjee: ममता बॅनर्जी ‘ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ हे नाव आणि ‘फुटबॉलपटू’ हे निवडणूक चिन्ह देण्यात आले. अरूप रॉय यांच्या नेतृत्वाखालील प्रतिस्पर्धी गटाला ‘डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस’

निवडणूक आयोगाचा निर्णय; ममता बॅनर्जींच्या पक्षाला नवे नाव, ‘फुटबॉल प्लेअर’ चिन्ह

Mamata Banerjee

 

अरूप रॉय गटाला ‘डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस’ आणि ‘लिफाफा’ चिन्ह

नवी दिल्ली (Mamata Banerjee Trinamool Congress) : पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) दोन प्रतिस्पर्धी गटांमधील पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह यावरून सुरू असलेल्या वादावर निवडणूक आयोगाने तूर्तास तोडगा काढला आहे. 6 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाने दोन्ही गटांना स्वतंत्र नावे आणि निवडणूक चिन्हे दिली आहेत. हा निर्णय अंतरिम स्वरूपाचा असून, पक्षाचे नाव आणि मूळ चिन्ह याबाबतचा अंतिम निर्णय स्वतंत्र प्रक्रियेत घेतला जाणार आहे.

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या नेतृत्वाखालील गटाला ‘ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ हे नाव आणि ‘फुटबॉलपटू’ हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. दुसरीकडे, अरूप रॉय यांच्या नेतृत्वाखालील प्रतिस्पर्धी गटाला ‘डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस’ हे नाव आणि ‘लिफाफा’ हे चिन्ह देण्यात आले आहे.

मूळ नाव आणि चिन्ह वापरण्यास मनाई

यापूर्वी गुरुवारी निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना पोटनिवडणुकीदरम्यान ‘ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ हे मूळ नाव आणि पक्षासाठी राखीव ‘फुले व गवत’ हे चिन्ह वापरण्यास मनाई केली होती. दोन्ही गटांना प्रत्येकी तीन पसंतीची नावे आणि मुक्त चिन्हांचे पर्याय शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर आयोगाने दोन्ही गटांसाठी नवी नावे आणि चिन्हे निश्चित केली.

आयोगाने स्पष्ट केले की, नव्या नावांमुळे मूळ ‘ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ (Trinamool Congress) या नावाशी संभ्रम निर्माण होऊ नये. तसेच निवडणूक चिन्ह हे आयोगाच्या मुक्त चिन्हांच्या यादीतूनच देण्यात येणार होते. या प्रक्रियेनंतर दोन्ही गटांना आगामी पोटनिवडणुकांमध्ये स्वतंत्र ओळख मिळाली आहे.

6 ऑक्टोबरला पोटनिवडणूक

पश्चिम बंगालमधील नंदीग्राम आणि रेजीनगर विधानसभा मतदारसंघांत 6 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Trinamool Congress) तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र झाला असून, दोन्ही गटांनी पक्षाच्या नाव आणि चिन्हावर दावा केला आहे. निवडणूक आयोगाचा सध्याचा निर्णय पोटनिवडणुकीसाठीची अंतरिम व्यवस्था आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसचे मूळ नाव आणि पारंपरिक चिन्ह याबाबतचा अंतिम हक्क कोणत्या गटाला मिळणार, याचा निर्णय पुढील प्रक्रियेनंतर होणार आहे.

संबंधित सामग्री

‘वोट चोरी, सरकार चोरी, आता पार्टी चोरी!’; राहुल गांधींचा हल्लाबोल

‘वोट चोरी, सरकार चोरी, आता पार्टी चोरी!’; राहुल गांधींचा हल्लाबोल

Rahul Gandhi: काँग्रेसवरील कारवाईचा संदर्भ देत यापूर्वीच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षचिन्हाच्या वादांचाही उल्लेख केला. तसेच, भाजप आणि निवडणूक आयोग संगनमत करून विरोधी पक्षांमध्ये फूट

Sep 18, 2026
एकनाथ शिंदेंच्या गुजराती भाषणावर संजय राऊतांचा निशाणा; ‘गुजराती नेत्यांना खूश करण्यासाठी बोलले असतील’

एकनाथ शिंदेंच्या गुजराती भाषणावर संजय राऊतांचा निशाणा; ‘गुजराती नेत्यांना खूश करण्यासाठी बोलले असतील’

वडनगरमधील एकनाथ शिंदेंच्या गुजराती भाषणावर संजय राऊतांची टीका; TMC चिन्ह प्रकरण आणि शिवसेना सुनावणीवरूनही निवडणूक आयोगावर आरोप.

Sep 18, 2026
ममता बॅनर्जींच्या भाचीचा घरात आढळला मृतदेह

ममता बॅनर्जींच्या भाचीचा घरात आढळला मृतदेह

Mamata Banerjee: तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भाची बृष्टी मुखर्जी हिचा मंगळवारी बीरभूम जिल्ह्यातील घरात मृत्यू झाला.

Sep 01, 2026
ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला; गाडीवर चिखल, चप्पल, बूट फेकले

ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला; गाडीवर चिखल, चप्पल, बूट फेकले

Mamata Banerjee: ममता बॅनर्जी याच्या ताफ्याला घेरले. या वेळी आंदोलकांनी 'चोर-चोर'च्या घोषणा देत त्यांच्या गाडीवर चिखल फेकल्याचा आरोप आहे.ही घटना बीजपूर येथे घडली.

Aug 09, 2026
ममता बॅनर्जींना मोठा धक्का? 100 टीएमसी नगरसेवकांनी दिला राजीनामा

ममता बॅनर्जींना मोठा धक्का? 100 टीएमसी नगरसेवकांनी दिला राजीनामा

TMC Mamata Banerjee: अंतर्गत संकट, राजीनामे आणि असंतोषाशी झुंजत असल्याचे दिसत आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की अनेक नगरपालिकांमध्ये पक्षाची मूळ रचनाच विस्कळीत झाल्यासारखी दिसत

May 27, 2026